बुऱ्हाणनगर येथे माजी मंत्री कर्डीले कुटुंबियांकडून जिल्ह्यातील महिलांचा सन्मान*
*हजारो महिलांची उपस्थिती ; पारंपरिक खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमाचा लुटला आनंद*
नगर : गावखेड्यातील महिला आज नव्या युगात नवी वाटचाल करीत आहे, राजकारण, समाजकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रासोबतच कुटुंबाची जबाबदारी अनेक महिला यशस्वीपणे पार पाडत आहे, या महिलांच्या सन्मानाला बळ देत जाणीव जागृतीसाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी नगर जिल्ह्यातील आणि विशेषतः राहुरी, पाथर्डी, नगर, तालुक्यातील वाड्यावस्त्यावरील महिलांसाठी हळदीकुंकुवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी जिल्हाभरातील २५ हजार पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती दर्शवत पारंपरिक खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला.
बुऱ्हाणनगर येथे महिला सन्मानासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या निवासस्थानी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी अलकाताई शिवाजीराव कर्डीले व प्रियांका अक्षय कर्डीले यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावत वाण भेट दिले. या कार्यक्रमासाठी धनश्री सुजय विखे, प्रतिभाताई बबनराव पाचपुते
यावेळी बोलताना अलका कर्डीले म्हणाल्या की, मकर संक्रात हा सण भारतीय संस्कृतीमध्ये महिलांसाठी एक पर्वणी म्हणून ओळखला जातो, म्हणून महिला वर्गात मकर संक्राती सणाला विशेष महत्त्व आहे, हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृतीचे जतन होण्याचे काम केले जात असते. तसेच एकत्रित जमलेल्या महिलांच्या विचारांची देवाणघेवाण देखील होत असते एकमेकांशी असलेली कटुता विसरून गोडी निर्माण व्हावी यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे त्यांनी सांगितले
यावेळी बोलताना प्रियांका कर्डीले म्हणाल्या की, कर्डीले परिवाराचे नागरिकांशी असलेल्या संवादामुळे ऋणानुबंध निर्माण झाले आहे. या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमातून स्नेहबंध निर्माण होत असतो, आपली परंपरा संस्कृती जोपासण्यासाठी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन केले आणि यातून एक प्रकारे आपल्या सर्वांमध्ये गोडवा निर्माण झाला आहे असे त्यांनी सांगितले.
*आज पर्यंतच्या महिलांच्या गर्दीचा झाला उच्चांक*
बुऱ्हाणनगर येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या निवासस्थानी महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी सकाळी १० ते रात्री ११ वाजेपर्यंत महिलांनी मोठी गर्दी केली होती, ही गर्दी म्हणजे कर्डीले कुटुंबियांच्या सामाजिक व राजकीय कार्यातील आत्तापर्यंतच्या गर्दीचा उच्चांक ठरला आहे, या कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता, यावेळी उखाणे, गवळणी, नृत्य सादर करत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला, तर या सांस्कृतिक कार्यक्रमात धनश्री सुजय विखे यांनी देखील महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला, पारंपरिक खेळासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महिलांसाठी मेजवानीच ठरली. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन उद्धव काळापहाड यांनी केले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय शिवाजी कर्डीले यांनी सर्व माता भगिनीचे आभार मानले