इंटरनॅशनल BIMSTEC स्पर्धेत सोलापूर ची श्रावणी सूर्यवंशी हीने भारतासाठी पटकावले गोल्ड,सिल्वर, ब्रोंज मेडल.
( सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी केले अभिनंदन)
सोलापूर प्रतिनिधी : दि.6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत दिल्लीतील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुल येथे १ली BIMSTEC एक्वाटिक्स चॅम्पियनशिप 2024 संपन्न झाली.
या स्पर्धेत डायविंग या क्रीड़ा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करताना सोलापुरच्या इंडियन मॉडेल स्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकणाऱ्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने हायबोर्ड मध्ये २३४.०० गुणासह सिल्वर मेडल, ३ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये २४२.३५ गुणासह गोल्ड मेडल, तर १ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये २०९.७५ गुणासह ब्रोंज मेडल पटकावले असून, यामुळे भारताला १ली BIMSTEC डाइविंग-वुमेन टीम चैम्पियनशिप प्राप्त झाली आहे. त्याबद्दल सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक सौ. वनिता सुरवसे यांनी श्रावणी सूर्यवंशी हिचे कौतुक करून अभिनंदन केले, व तसेच एवढ्या कामाच्या व्यापातून आई वडील सुद्धा तिच्या साठी रात्रंदिवस झटत असतात, मी नेहमी वृत्त पत्रातून तिच्या बातम्या पाहत असते तिच्या आईवडिलांकडून जो तिला सपोर्ट मिळत आहे त्यासाठी आई वडीला चे सुद्धा कौतुक करावे तितके कमी च आहे. भारताला १ली BIMSTEC डाइविंग-वुमेन टीम चैम्पियनशिप मिळाली त्यामध्ये श्रावणी सूर्यवंशी चा सिंहाचा वाटा आहे यासाठी आम्हा सर्व सोलापूर कराना श्रावणीचा सार्थ अभिमान आहे, सोलापूर जिल्ह्यातील सर्व सरपंचा तर्फे आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांतर्फे श्रावणी चा आलेख असाच वाढत राहावा यासाठी सरपंचं परिषदेच्या जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे यांनी शुभेच्छा दिल्या.
यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्री.श्रीकांत शेटे सर, रेल्वे कोच भाऊसाहेब दिघे सर, ASI कोच कुंजकिशोर मेलम सर, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे त्यांचे ही सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी अभिनंदन केले आहे.