आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने गोगांव येथे नवीन 220 के व्ही उपकेंद्र मंजूर.

 आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने गोगांव येथे नवीन 220 के व्ही उपकेंद्र मंजूर.

गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांच्या पाठपुराव्याला यश.
———
अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नाने व गोगांव चे सरपंच वनिता सुरवसे
यांच्या सतत पाठपुराव्यामुळे गोगांव येथे नवीन 220 /132/33 के व्ही उपकेंद्र मंजूर झाला आहे. गोगांव, खैराट, वागदरी परिसरात उपकेंद्र मंजूर झाल्याने शेतकरी व नागरिकात उत्साहा संचारला आहे.कारण या प्रोजेक्ट मुळे या भागातील एक हजार एकर जमीन जाणार असून जवळपास शंभर करोड रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे.या प्रोजेक्ट मुळे या भागातील 
जमिनीचे अंदाजे 70 ते 80 कोटी रुपये टर्नओव्हर होणार आहे.220 kv वीज निर्मिती तयार करण्यासाठी अंदाजे 1100 करोड रुपयांचा खर्च सोलार कंपनी उचलणार आहे.या प्रोजेक्ट मुळे या भागातील 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह ही होणार आहे.तसेच या परिसरातील ट्रॅक्टर,जेसीबी,मजूरांना मुबलक काम ही मिळणार आहे.या उपकेंद्रामुळे गोगांव गावच्या महसूल मध्ये पाचपट वाढ होणार असल्याचे सरपंच वनिता सुरवसे यांनी सांगितले.गोगांव येते हा प्रोजेक्ट मंजूर झाल्याने पुणे येथील महापारेषण कंपनीचे मुख्य अभियंता अनिल कोलप आणि अधीक्षक अभियंता संदीप हाके यांची भेट घेऊन सरपंच वनिता सुरवसे यांनी गोगांव ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.वागदरी भागात 220/132/33 उपकेंद्र होण्यासाठी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखली सरपंच वनिता सुरवसे यांचा वर्षभरापासून सतत प्रयत्न सुरु होता.आता गोगाव येथील नवीन उपकेंद्राचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे आश्वासन मुख्य अभियंता अनिल कोलप यांनी दिली आहे. उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून जमीन हस्तांतरणाचे काम ही पूर्ण झाल्याचे सांगितले.येत्या महिनाभरात उपकेंद्राच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सरपंच वनिता सुरवसे यांनी सांगितल्या.आता लवकरच मंजूर झालेल्या उपकेंद्राचे भुमिपूजन होणार आहे.या उपकेंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याची विनंती सरपंच वनिता सुरवसे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे केली आहे.आता या भागातील सोलर कंपन्याना मोठा दिलासा मिळणार आहे. गावासाठी मोठ्याप्रमाणात रोजगार ही उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सरपंच वनिता सुरवसे यांनी सांगितल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *