Iकोरोना काळात विमानाने रेमडीसिवर आणून धंदे केले आ. निलेश लंके यांचा विखे वर हल्लाबोल
अहमदनगर- नगर -पारनेर मतदार संघात मी केलेल्या कामाचं कुणीही उद्घाटन करत आहे, मी कधीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाहीत. सध्या जिल्हा परिषदेत मंजूर झालेल्या प्रशासकीय मान्यता स्वतःच्या नावावर खपवल्या जात आहे. मी जे बोलतो तेच करतो,आमदार झाल्यापासून माझ्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. काही लोकांनी कोरोना काळात विमानाने रेमडीसिवरआणून धंदे केले, ते कुठे गेलेत, ते विकले असा हल्लाबोल आ. निलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता लावला.
आमदार निलेश लंके यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या तसेच दीड कोटी कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन अकोळनेर येथे केले होते यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषदेचे बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, पंचायत समितीच्या माजी सभापती नंदा शेंडगे,माजी सरपंच सविता मेहत्रे, भानुदास जाधव, बाळासाहेब शेळके, गंगाधर ठुबे, संजय गारुडकर, बाळासाहेब भोर, नारायण राऊत, जितेंद्र मगर,सिकंदर सुबुकडे, रामचंद्र जाधव, सुनील पाठक, अर्जुन सोनवणे, रावसाहेब गारुडकर, सोमनाथ गारुडकर, भगवान भोर, माणिक जाधव, काका जाधव, जयदीप कोळगे, रमेश जाधव, दिलीप भोर,जीवन गायकवाड, प्रियंका लामखडे, भास्कर भोर, गणेश साठे, जनार्दन माने, सचिन दळवी, शिवाजी होळकर उपस्थित होते. यावेळी लंके म्हणाले थोड्याफार प्रमाणात आता दक्षिणेत वार येणार आहे मी इतर पुढाऱ्यासारखा नाही, फोन उचलला नाही तर पंधरा मिनिटात फोन येतो. मी राज्याला पहिला आमदार आहे की नगर पारनेर मतदारसंघात २५ गावे बिनविरोध केली. नगर पारनेर मतदार संघात विधानसभेला उमेदवार नाही असे म्हणत होते, काय झालं ६५ हजार मतांनी विजयी झालो. आता नगर दक्षिणेत खासदारकीला उमेदवार नाही असे बोलले जात आहे. मी भोळा असला तरी राजकारणाचे डावपेच शिकलो आहे .मला माणसे ओळखता येतात कोण साथ देणार, कोण रथ सोडणार. राजकारणात विकासाचे काम करण्याचा प्रयत्न केला. काहीणी राजकारणात सत्तेचा गैरवापर करत याला जेलमध्ये टाक त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते