दहिगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन , श्रीराम नवमीला होणार सांगता…*

 दहिगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन , श्रीराम नवमीला होणार सांगता…*

रुईछत्तिशी – नगर तालुक्यातील दहिगाव येथे श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी श्रीराम नवमी उत्साहात साजरी केली जाते.नगर तालुक्यात एक मोठा श्रीराम उत्सव दहिगाव येथे पहायला मिळतो.ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यासाठी जवळपास १०० जणांनी सहभाग घेतला आहे.रात्री ७ ते ९ यावेळेत कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.हभप विकासानंद महाराज मिसाळ , बापूसाहेब महाराज पवार , अशोक महाराज ईगल , गणेश महाराज घोडके , बबन महाराज बहिरवाल , गोविंद महाराज शिंदे , राम महाराज डोंगर , गोरे काका परभणीकर , हरिदास महाराज पालवे , नारायण महाराज जाधव तसेच श्रीराम नवमीच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांचे काल्याचे किर्तन होईल.
          श्रीराम नवमीच्या अगोदर १७ एप्रिल रोजी सकाळी कावड मिरवणूक होणार आहे. दशक्रोशीतील सर्व गावांनी हरिजागर मध्ये सहभाग घेतला आहे.श्रीराम नवमीच्या दिवशी ज्ञानेश्र्वरीची टाळपथक व भजनी मंडळाच्या साहाय्याने मिरवणूक काढण्यात येणार आहे.पारायण व्यासपीठ हभप भाऊसाहेब महाराज आन्हाड व सखाराम महाराज म्हस्के चालवणार आहेत.गुढी पाडव्या पासून श्रीराम नवमी पर्यंत हा सप्ताह दहा दिवसांचा सर्वात मोठा सप्ताह म्हणून गणला जातो.शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून नगर तालुक्यातील सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ व सप्ताह समितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *