गुढीपाडव्यानिमित्त “पुस्तकांची गुढी” उपक्रम; वाचनाचा संदेश देत महिला दिनही साजरा

गुढीपाडव्यानिमित्त “पुस्तकांची गुढी” उपक्रम; वाचनाचा संदेश देत महिला दिनही साजरा
अहिल्यानगर : गुढीपाडव्याच्या निमित्ताने वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि समाजात ज्ञानाची गुढी उभारली जावी या उद्देशाने केडगाव येथील शिवाजी गोविंदराव नाईकवाडी यांच्या वतीने गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता “पुस्तकांची गुढी” हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
“सावित्री-ज्योतिबाची लेकरे आम्ही, मागे आता राहणार नाही” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली हा कार्यक्रम पार पडणार असून “वाचाल तर वाचाल” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा यामागचा उद्देश आहे. यावेळी जागतिक महिला दिनाचाही उत्साहात साजरा करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी नागरिकांनी घरी असलेली चांगली पुस्तके साने गुरुजी वाचनालयासाठी देणगी स्वरूपात आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानाची परंपरा पुढे नेण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा कार्यक्रम केडगाव इंडस्ट्रियल एरिया रोड, समर्थ नगर, जे.एल.पी. टॉवरच्या पाठीमागे असलेल्या “स्पर्श” (प्लॉट नं. ४५) या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाला परिसरातील नागरिक, वाचनप्रेमी तसेच महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी गोविंदराव नाईकवाडी यांनी केले आहे.
मोबाईल : ९४२३४४७२०५.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *