२४ तास ३६५ दिवस जनतेसाठी तत्पर – सौ. विद्याताई दिपक (मल्लू) खैरे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
अहिल्यानगर -महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ क मध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. विद्याताई दिपक (मल्लू) खैरे यांनी निवडणूक रिंगणात जोरदार एन्ट्री घेतली असून, त्यांच्या उमेदवारीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सौ. विद्याताई खैरे या गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी २४ तास ३६५ दिवस तत्पर राहिल्या आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वीज, आरोग्य, महिला व युवकांचे प्रश्न अशा विविध नागरी समस्यांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून काम केले आहे. त्यामुळे त्या “काम करणारी, बोलणारी नव्हे तर परिणाम देणारी नेतृत्त्व” म्हणून ओळखल्या जात आहेत.
प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद, घराघरांत जाऊन समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे ही त्यांची कामाची पद्धत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांना रोजगार व मार्गदर्शनासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम विश्वास ठेवत पक्षाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा संकल्प आहे. “राजकारण हे सेवा करण्याचे माध्यम आहे” या भावनेतून त्या निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत.
या निवडणुकीत सौ. विद्याताई दिपक (मल्लू) खैरे यांना अनुक्रमांक २ असून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. विकास, विश्वास आणि सेवाभावाच्या जोरावर प्रभाग क्रमांक १५ क मधील मतदार त्यांना पुन्हा एकदा संधी देतील, असा विश्वास शिवसैनिक व नागरिक व्यक्त करत आहेत
२४ तास ३६५ दिवस जनतेसाठी तत्पर – सौ. विद्याताई दिपक (मल्लू) खैरे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा


