एमआयडीसी रोजगारातून देहरे गटातील तरुणाना विशेषतः नवनागापूर–वडगावच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला 

एमआयडीसी रोजगारातून देहरे गटातील तरुणाना विशेषतः नवनागापूर–वडगावच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला 

नवनागापूर येथे जनसंपर्क कार्यालयामुळे 

देहरे जिल्हा परिषद गटात जालींदर कदम यांचा जनसंपर्क वाढतोय

नवनागापूर व वडगाव परिसरातील बहुसंख्य कामगारांना एमआयडीसीमध्ये प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आदर्शगावचे सरपंच जालींदर कदम यांनी केवळ आश्वासनांपुरते न राहता ठोस कामगिरी करून दाखवली आहे. रोजगारामुळे तरुणांच्या हाताला काम मिळाले असून स्थलांतर थांबले आहे. हीच कामगिरी आज त्यांच्या आक्रमक आणि लोकाभिमुख नेतृत्वाची ओळख ठरत आहे.

नवनागापूरमध्येच कार्यालय सुरू केल्याने नागरिकांसाठी थेट संपर्काची व्यवस्था निर्माण झाली आहे. दिवसभर नवनागापूर येथे नागरिकांसाठी उपलब्ध राहिल्यामुळे पाणी, रस्ते, वीज, रोजगार, शासकीय कामकाज आदी अनेक प्रश्न तातडीने निकाली निघत आहेत. “लोकप्रतिनिधी कार्यालयात बसून नाही, तर लोकांमध्ये राहून काम करतो,” हा जालींदर कदम यांचा कार्यपद्धतीचा ठाम संदेश आहे.

एमआयडीसी नागपूर येथे पूर्णवेळ संपर्क व समन्वय ठेवल्यामुळे देहरे जिल्हा परिषद गटातील गावांतील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. रोजगार, प्रशासनाशी समन्वय आणि जनतेची सतत दखल—या त्रिसूत्रीमुळे देहरे गटात कदम यांचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे.

“विकासासाठी वेळ, श्रम आणि निर्णयक्षमता लागते—मी ते देतोय,” असे सांगत जालींदर कदम यांनी देहरे जिल्हा परिषद गटातही रोजगारकेंद्रित, पारदर्शक आणि परिणामकारक विकासाचा आराखडा उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे येणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये देहरे गटात नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *