धनादेश न वटल्याप्रकरणी पतसंस्थेच्या कर्जदारास शिक्षा
महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेला दिला होता चेक
संस्थेतर्फे अॅड. विनायक बाळासाहेब तोडमल अहमदनगर यांनी काम पाहिले.
अहमदनगर -महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था, भिंगार यांना कर्जाच्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश वटला नाही म्हणून आरोपी संतोष दिलीप भालसिंग रा. मु. शहापुर, पो. निंबोडी, ता. जि. अहमदनगर यास में. श्री. डी. डी. कर्वे (19 वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी) यांनी 3 महिन्यांचा साधा कारावास तथा रक्कम रू. 2.54,000/- द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आरोपीने सदर द्रव्य दंडाचा भरणा न केल्यास त्याला मुख्य कारावासाचे व्यतिरिक्त 15 दिवसाचा साधा कारवास भोगावा लागेल अशी शिक्षा सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था, भिंगार, अहमदनगर यांच्याकडून संतोष दिलीप भालसिंग रा. मु शहापुर, पो. निंबोडी, ता. जि. अहमदनगर यांनी कर्ज रक्कम रू 30,00,000/- व्यवसाय वाढीसाठी घेतलेले होते व सदर कर्जाच्या थकबाकीपोटी दि. 12/07/2022 रोजी रु. 2,00,000/- उज्जीवन स्मॉल फायनान्स बैंक, शाखा अहमदनगर या बँकेचा चेक नं. 223852 चा दिला होता. सदर धनादेश न वटल्यामुळे पतसंस्थेने संतोष दिलीप भालसिंग यांच्यावर एन. आय. अॅक्ट 138 नुसार फौजदारी खटला दाखल केला होता. या खटल्यात फिर्यादी संस्थेचे अधिकारी राजेंद्र काशिनाथ पांढरे यांनी दिलेल्या साक्ष व पुराव्याच्या आधारे गुन्हा सिध्द झाल्याने संतोष दिलीप भालसिंग यांना दोषी ठरवून मे. डी. डी. कर्वे यांनी संतोष दिलीप भालसिंग यांना 3 महिने साधी कैद व 2,54,000/- रू. दंड ठोतावला असुन त्या रकमेतुन फिर्यादी संस्थेस 2,51,000/- रू देण्याचा आदेश केलेला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी 15 दिवस साधी कैद असा आदेश दिला. फिर्यादी संस्थेतर्फे अॅड. विनायक बाळासाहेब तोडमल अहमदनगर यांनी काम पाहिले.