प्रभाग क्रमांक १५ मध्ये मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील विरंगुळा मैदान ते मल्हार चौक परिसरातील (मेन रोड) अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. सदर रस्ता अतिशय खराब झाला झाला होता.हा रस्ता प्रभागातील नागरिकांसाठी तसेच दैनंदिन वाहतुकीसाठी प्रमुख आणि अत्यावश्यक मार्ग असून, रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले आहे.
सदर काँक्रिटीकरणाचे काम नगरसेवक मा. श्री. अनिल माधवराव शिंदे यांच्या विशेष विकास निधीतून करण्यात येत आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस सुलभता मिळणार असून पावसाळ्यात होणाऱ्या अडचणींना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे.
हे काम येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून, लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी या रस्त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. विकासकामांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १५ मध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्री. अनिल माधवराव शिंदे
जिल्हाप्रमुख, शिवसेना, अहिल्यानगर
सौ. शिलाताई अनिल शिंदे
प्रथम महिला महापौर


