राजकीय वारसा नसतानाही डॉ. दिलीप पवार यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांची घौडदौड सुरू ठेवली
आहिल्यानगर (प्रतिनिधी) — कोणताही राजकीय वारसा नसतानाही केवळ कर्तृत्व, सातत्य आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. दिलीप पवार यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या डॉ. पवार यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत भरीव कामगिरी केली आहे.
रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सोयी, स्वच्छता, गटार योजना तसेच वीजपुरवठा आदी महत्त्वाच्या कामांसाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे प्रत्यक्षात मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सामान्य नागरिकांच्या अडचणी स्वतः समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची कार्यपद्धती, हीच त्यांची खरी ओळख बनली आहे. “कामातूनच राजकारण” हा मंत्र जपत त्यांनी राजकीय वारसा नसतानाही स्वबळावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज आहिल्यानगर तालुक्यातील नागरिकांमध्ये डॉ. दिलीप पवार यांच्याबाबत मोठा विश्वास असून युवकवर्गासाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. आगामी काळातही त्यांच्या माध्यमातून आणखी विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.


