गुंडेगाव सेवा सोसायटीच्या सभापतीपदी रावसाहेब कोतकर तर उपसभापतीपदी अंबादास धावडे
वाळकी प्रतिनिधी :- गुंडेगाव ता. नगर येथील गुंडेगाव नंबर 1 सेवा सोसायटीच्या सभापतीपदी श्री रावसाहेब सुभाष कोतकर तर उपसभापतीपदी श्री अंबादास धावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रत्येक वर्षी 100% वसूल, आर्थिक शिस्त व सभासदभिमुख पारदर्शक कारभार याचे जोरावर गत आर्थिक वर्षात संस्थेने ऑडिट वर्ग अ प्राप्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एक आदर्श संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. संस्थेच्या माध्यमातून सभासदांना दरवर्षी लाभांशाचे वाटप केले जाते, याही वर्षी संस्थेने सभासदांना 14 टक्के लाभांशाचे वाटप केले आहे. गतवर्षीच्या अहवाल वर्षापर्यंत संस्थेचा नफा हा सव्वा कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.या नफ्यातून संस्थेच्या स्वमालकीची इमारत उभारण्यावर चर्चा करून त्याद्वारे सभासद व ग्रामस्थांसाठी फूड मॉल उभारून अल्प दरात सेवा देण्याचे ठरले. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनातही वाढ करण्याचे ठरले.
सभापती पदासाठीची सूचना ज्येष्ठ संचालक वामनराव जाधव यांनी मांडली त्यास मावळते सभापती शंकर हराळ यांनी अनुमोदन दिले. उपसभापतीपदाची सूचना पंडितराव भापकर यांनी मांडली त्यास चंद्रकांत निकम यांनी अनुमोदन दिले. सदर पदासाठी दोनच अर्ज प्राप्त झाल्याने निवडूणूक बिनविरोध पार पडली .
यावेळी संस्थेचे संचालक भाऊसाहेब कोतकर, रामदास भापकर,भास्कर कोतकर , अशोकराव पवार, धनंजय हराळ, गोपाल बैरागी, सचिन कुताळ उपस्थित होते.
अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले, वामनराव जाधव, जिल्हा फर्टीलायझर असोसिएशनचे अध्यक्ष छबुरावजी हराळ,उपसरपंच . भाऊसाहेब हराळ,उद्योजक सस्ते नाना व सर्व ग्रामस्थांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.