चास येथील सर्वपक्षीयाची एकजूट; पोपट घुंगार्डे यांच्या उमेदवारीला व्यापक पाठींबा. उमेदवारीवर ठाम
आहिल्यानगर – निंबळक जिल्हा परिषद गटातून आगामी निवडणुकीत पोपट घुंगार्डे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनी एकत्र येत जोरदार पाठिंबा दर्शविला आहे. घुंगार्डे यांच्या प्रामाणिक कार्यशैली, लोकसंग्रह आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे गटाच्या भवितव्याचा मजबूत नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गावातील तसेच परीसरातील अनेक पक्षांचे पदाधिकारी एका व्यासपीठावर येऊन घुंगार्डे यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. स्थानिक विकासकामांवरील त्यांचे सातत्य, सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ आणि समस्या सोडविण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच त्यांना संधी द्यावी, असा सर्वांचे एकमताने निर्णय झाला.
पोपट घुंगार्डे यांची उमेदवारी मिळाल्यास गटातील विविध प्रलंबित कामांना गती मिळून विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यावेळी गावातील ग्रामस्थ, महिला मोठया संख्येने उपस्थित होते


