जामखेड: फक्राबाद येथे शेतकऱ्यांसाठी कागदी लिंबू लागवड तंत्रज्ञान व पीक संरक्षण कार्यक्रम संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय हाळगाव येथील कृषि कन्यांच्या पुढाकारातून" ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२५ - २६" अंतर्गत फक्राबाद येथे शेतकऱ्यांसाठी कागदी लिंबू लागवड तंत्रज्ञान व पीक संरक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन वंजारवाडी, फक्राबाद आणि चौंडी या गावच्या कृषि कन्यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक पोपट पवार , उद्यान विद्या शास्त्र विभाग यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले. त्यांनी शेतकऱ्यांना लिंबू लागवड तंत्रज्ञान जमिनीची निवड कशी करावी त्यापासून लिंबूचे काढणी तंत्रज्ञानापर्यंत सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसनही त्यांनी केले. त्याचप्रमाणे वनस्पती रोग शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मनोज गुड यांनी लिंबू पिकावरील बुरशी, करपा, खैरा आणि डाळिंब पिकाच्या तेल्या आणि इतर बुरशी आणि जिवाणू रोग आणि त्यांचे नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर लिंबू पिकावरील फळमाशी , शेंडी कीड , रस शोषणाऱ्या किडी व डाळिंबावरील फुल कीड व फळ किड यांच्या नियोजनाबद्दल डॉ. धनेश्वर पाटील, कृषि कीटक शास्त्र विभाग यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात आला. कागदी लिंबू लागवड तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण तंत्रज्ञानात वाढ होऊन नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी होईल असे मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आसपासच्या परिसरातील एकूण ७० शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ .दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ वामन, केंद्रप्रमुख डॉ. प्रेरणा भोसले, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्कर्षा गवारे तसेच विषय विशेष तज्ञ कृषी विस्तार शिक्षण विभाग डॉ. प्रणाली ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
फक्राबाद येथे शेतकऱ्यांसाठी कागदी लिंबू लागवड तंत्रज्ञान व पीक संरक्षण कार्यक्रम संपन्न


