नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी प्रकाश ठोंबरे
चिचोंडी पाटील-अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक संघटनेच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल व नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नृसिंह माध्यमिक विद्यालय,भातोडीचे मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे यांचा इंजि.प्रविण कोकाटे मित्र मंडळ, सुप्रभात ग्रुप,चिचोंडी पाटील,विविध कार्यकारी सेवा सोसायटी व मित्र परिवाराच्या वतीने पंचायत समितीचे मा.सभापती प्रविण कोकाटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
इंजि.प्रविण कोकाटे यांनी ठोंबरे सर यांना मिळालेला आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व तालुका मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड ही सरांनी शाळेच्या प्रगतीसाठी,गुणवत्ता वाढीसाठी व परिसरात एक आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे फलित असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सेवा सोसायटीचे चेअरमन संदीप कोकाटे,मा.चेअरमन राजेंद्र मारुती कोकाटे,मा.सरपंच दिलीप पवार,सोसायटीचे संचालक सुरेश ठोंबरे,अर्जुन वाडेकर,पंडितराव कोकाटे,बबन कोकाटे,उपसरपंच विश्वसागर कोकाटे,अण्णासाहेब कोकाटे,अँड.लक्ष्मण हजारे, सिताराम खराडे,अनिल सुरवसे,प्रशांत कांबळे,आदर्श शिक्षक विजय कोकाटे,स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाचे सचिव संतोष पवार,बाळासाहेब गदादे,संतोष वाघ,अश्विन कळमकर,राजेंद्र तनपुरे,भाऊसाहेब वाडेकर,अशोक काकडे,प्रा.विजय कोकाटे,हनुमंत खेडकर,जयसिंग दळवी,नानासाहेब कोकाटे,संजय कोकाटे,मंगेश कोकाटे आदी उपस्थित होते.


