कर्डिले यांनी डोळयावरील काळा चष्मा काढावा विकास दाखवतो

कर्डिलेंनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा विकास दाखवतो !

आ.प्राजक्त तनपुरे यांचे शिवाजी कर्डिले यांना खुले आव्हान!

राहुरी(प्रतिनिधी)

    शिवाजी कर्डिले यांनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा मग त्यांना दाखवतो राहुरी मतदार संघाचा काय विकास केला आहे. मतदार संघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली असून देखील जर त्यांना विकास दिसत नसेल तर त्यांनी समोर यावं आणि चर्चा करावी असे खुले आव्हान आ.प्राजक्त तनपुरे यांनी उमेद्वार शिवाजी कर्डिले यांना केले आहे.

   गुरवारी सकाळी प्रवारा पट्टा परिसरात   महाविकास आघाडीतीचे उमेद्वार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जन आर्शिवाद याञा दरम्यान मतदारांशी संवाद साधला आ. तनपुरे यांनी पञकारांशी संवाद साधताना कर्डिले यांच्या टिकेला उत्तर देताना सांगितले की, कर्डिले हे देखील पंचवीस वर्ष आमदार होते ते देखील मंत्री राहिलेले आहेत निळवंडे धरणाच्या प्रश्नावर त्यांनी दोन वेळा निवडणुका काढल्या असून जनतेची फसवणूक केली. आम्ही मात्र पहिल्याच वेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साडेबाराशे कोटी रुपये धरणाच्या कालव्यासाठी आणले असून तो प्रश्न मार्गी लावला आहे. मतदारसंघात सहा सबस्टेशन आणि शेकडो ट्रान्सफॉर्मर बसवले यांनी एक तरी ट्रांसफार्मर बसवला का याचे आत्मपरीक्षण करावे. राहुरी बस स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.

वांबोरी चारीला पाणी आणतो अशा सातत्याने कर्डिले यानी वल्गना केल्या मात्र ते देखील काम आम्ही आमच्या काळात पूर्ण केले. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात देखील विकास कामे केली. पाथर्डी तालुक्यात मृद जलसंधारणाच्या माध्यमातून कित्येक तलावांची कामे पूर्ण केली. नागरदेवळा भागामध्ये विकासाचे व्हिजन ठरवून ग्रामपंचायतीची नगरपालिका केली परंतु यांच्या सरकारमध्ये यांनी पुन्हा नगरपालिकेची ग्रामपंचायत केली. केवळ यांच्या राजकारणामुळे त्यांनी त्या भागातील विकास खुंटवला. आम्ही विजेची पाण्याची,त्याचबरोबर शहरी तसेच ग्रामीण भागात मूलभूत प्रश्नांची सोडवणूक केली यांनी यांनी दहा वर्षात कुठलं एक विकासाचं काम खेल ते सांगावे केवळ भाषणे करायला काय लागतं आधी भाषण करायचं बोलायचं शिकावं मग आमच्यावर टीका करावी अशी टिका  आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *