नवनागापूर येथे वारक -यासाठी मोफत औषधोपचार केंद्र सुरू
डॉ. गडगे हॉस्पीटल व ओम सोशल फौडेशन उपक्रम
निंबळक-आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्याची आरोग्य सेवा मिळावी या हेतुने डॉ.गडगे रुग्णालय यांनी सुरू केलेले मोफत आरोग्य सेंटर चे उद्धाटन
योगीराज गगनागिरी महाराज सरला बेट गोदाधाम महंत राष्ट्रसंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
नगर मनमाड महामार्गावरील नवनागापूर ( ता. नगर ) येथे ओम सोशल फौंडेशन व गडगे हॉस्पीटल च्या वतीने पंढरपुर येथे निघालेल्या वारकऱ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतुने मोफत औषधोपचार केंद्र सुरू केले. गेल्या पंधरा वर्षापासून हे फौंडेशन वारकऱ्याची सेवा करत आहे. आत्तापर्यत लाखो वारकऱ्यानी या सेवेचा फायदा घेतला. नगर मनमाड महामार्गावरुन मो6या प्रमाणात दिंडी जातात. या आरोग्य केंद्राचा फायदा वारकऱ्याना होत आहे. आज दिवसभर आठ हजार वारकऱ्याना मोफत औषधे, एनर्जी ड्रिंक वाटण्यात आले यावेळी
डॉ संजीव गडगे, डॉ. सुजाता गडगे, आप्पासाहेब सप्रे, संजय भोर, मनोहर वाघ, हभप रावसाहेब खराडे, सर्जेराव पठारे, रामदास कारखिले, कारभारी क्षेत्रे, बाबासहेब बोरकर नितीन ग०हाणे, संदिप बेल्हेकर, शरद आढाव , भाऊसाहेब गुंजाळ, डॉ महेश कोळेकर, दत्तात्रय चौरे, चंद्रकांत मोरे, डॉ. संजय कोते, सुधीर गायकवाड, संकेत खोडदे, विनायक फाकटकर, सुधीर होले, उपस्थित होते.
चौकट- वारकऱ्याच्या सेवेसाठी डॉ़ गडगे हॉस्पीटलने सुर ) केलेले मोफत आरोग्य केंद्र हे वारकऱ्यासाठी फायदयाचे ठरत आहे .हि सेवा खरोखरच चांगली आहे .प्रत्येक वर्षी माझ्या हाताने या आरोग्य केंद्राचे उद्घाटन होत आहेत. हे माझे भाग्य समजतो -हभप रामगिरी महाराज
चौकट- गेल्या नऊ वर्षापासून आम्ही वारक- याची सेवा करत आहोत. वारकऱ्यासाठी अंगदुखी,मालीश तेल, गुडघ्यासा०ी बेल्ट, डोकेदुखणे ,कणकण येणे वेदनाशामक गोळ्या, खोकला औषधे आदि ५कारचे औषधे मोफत देत आहोत या माध्यमातून वारकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळते. प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठल आहे
.डॉ संजीव गडगे