ग्रामीण कृषी जागरूकता अंतर्गत वाळुंज येथे चर्चासत्र उत्साहात
नगर, दि.16-विळद घाट येथील डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वाळुंज (ता.नगर) येथे शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब दरेकर होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. विवेक निकम, सहायक कृषी अधिकारी पांडुरंग घोरपडे, तसेच सुमिटोमो अँग्रोकेमिकलचे मच्छिंद्र वाघ, पारिजात कंपनीचे संदीप कचरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी नारायण करांडे, उप कृषी अधिकारी संजय बोरुडे, बी. टी. गडधे, कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक प्रा. के.एस.दांगडे, सहाय्यक कृषी अधिकारी संतोष उगले व अनिल तोरकड, प्रगतशील शेतकरी पोपटराव साठे, रावसाहेब शिंदे, संतोष जाधव, अर्जुन कर्डिले, शिवाजी कर्डिले, विलास ढाकणे, अशोक दरेकर, अनिल दरेकर, हनुमंत काकडे, नामदेव गायकवाड, सोमनाथ जाधव, जनार्दन हिंगे उपस्थित होते. चर्चासत्र यशस्वीतेसाठी कृषिदूत ओम बेंडाळे, शिवम भोर, साहिल जाधव, सुमित गोलेकर, अभिजीत गाडे यांनी परिश्रम घेतले.
पांडुरंग घोरपडे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. विवेक निकम यांनी खरीप हंगामातील मका पिकाचे उत्पादन, वाढवण्याचे तंत्रज्ञान, बियाण्याची उगम क्षमता चाचणी व सामूहिक बीज प्रक्रियेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. नारायण करांडे यांनी खरीप हंगामातील विविध कृषी मोहिमेबाबत शेतकर्यांच्या शंकांचे निरासन केले. बी. टी. गडधे व संजय बोरुडे यांनी शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे तसेच कृषी विभागाच्या उपक्रम बाबत माहिती दिली.या कार्यक्रमास प्रा. सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत, सरपंच पार्वती हिंगे, उपसरपंच कविता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक प्रा. के.एस. दांगडे यांनी केले. सूत्रसंचालन कृषीदूत सुमित गोलेकर व आभार प्रदर्शन अभिजीत गाडे यांनी मानले.
ग्रामीण कृषी जागरूकता अंतर्गत वाळुंज येथे चर्चासत्र उत्साहात


