सरपंच प्रतिक शेळके यांच्या व वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम
शिवशंभो गर्जना भव्य कार्यक्रम
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अभिजीत जाधव व अनु जाधव याची उपस्थिती
आहिल्यानगर – अकोळनेर ( ता. आहिल्यानगर ) येथील सरपंच प्रतीक शेळके यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवत आपला वाढदिवस साजरा करणार .
येथील सरपंच प्रतीक शेळके यांचा शुक्रवार दिनांक ११ रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांनी अनावश्यक खर्च टाळून या दिवशी त्यांनी रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप, तसेच अनाथ आश्रमात अन्नदानाचा व संध्याकाळी शिवगर्जना चा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिध्द गायक अभिजीत जाधव व अनु जाधव याचा शिवशंभो गर्जना या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सरपंच प्रतीक शेळके यांसरपंच प्रतिक शेळके यांच्या व वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम उपक्रम नी गावचा पदभार स्वीकारल्यानंतर गावाचा कायापालट केला गेल्या चार वर्षापासून गावातील विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून गावकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. गावातील कुठलेही यात्रा उत्सव, सण असले तरी जातीय सलोखाराखण्याचे काम केले. नुकताच तुकाराम महाराज बीज कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात लाखो भाविकांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ घेतला होता. त्यांच्या या विविध उपक्रमामुळे गावातील वातावरण हे भक्तिमय प्रकारचे झाले आहे. प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी वह्या पाठ्यपुस्तक, शैक्षणिक साहित्याचे ही वाटप आतापर्यंत केलेले आहे. या कार्यक्रमासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील,आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते उपस्थित राहणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक शेळके मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


