आषाढी एकादशी निमित्त खडकी येथे बाल वारकऱ्याची दिंडी
आहिल्यानगर – टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका देत रामकृष्ण हरी, विठू नामाचा गजर करत खडकी येथे आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद शाळेतील बाल वारकऱ्यानी काढलेल्या दिंडीमध्ये खडकी गाव हरिनामाच्या गजरात दुमदुमले होते.
आषाढी एकादशी निमित्त खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य अशी दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी व पार पांरीक वारकऱ्यची वेशभूषा परिधान केले होती. विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष तसेच मुलींनी तुळशी वृंदावन घेत टाळ मृदंगाच्या तालात गावातून भव्य अशी फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर, विठू नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा ठेका धरला. गावात भव्य अशी मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी घोसपुरी पाणी पुरवठा चे संचालक सचिन कोठुळे यांनी वन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वृक्ष याप्रमाणे दीडशे वृक्ष, तसेच फराळाचे वाटप केले. हे झाड जगवणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी सरपंच प्रविण कोठुळे यांच्याकडे शंभर रूपये, सचिन कोठुळे यांच्या कडून दोनशे रुपये बक्षीस यावेळी त्यांनी जाहीर केले. प्रत्येक झाडाला आईचे नाव घ्यायचे असे विद्यार्थीना यावेळी मुख्याध्यापक राजकुमार चोथे यांनी सांगीतले. या शाळेमध्ये उपक्रमशील शाळा म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला. पुरस्कार
मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.यावेळी मुलांनी व पालकांनी फुगडया खेळत आनंद व्यक्त केला होता. सेवा संस्थेचे अध्यक्ष केतन निकम यांनी विद्यालयास इंटरनेट साठी लागणारी उपकरण भेट दिले. यावेळी महेश कोठुळे, आदिनाथ गायकवाड, अशोक रोकडे, हौशीराम वाडेकर, रोहीदास कोठुळे उपस्थित होते
मुख्याध्यापक राजकुमार चोभ प्रशांत गांगर्डे, शंकर पवार, छाया कोतकर, मनिषा सोळसे
आदर्श उपक्रमशिल शाळा मिळालेबद्दल यांचा सन्मान करण्यात आला
सह शिक्षक पालक उपस्थित होते.


