अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची राज्य कार्यकारिणी सभा संपन्न
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य स्तरावर अंदोलन करण्याची ठोस भूमिका – राजेंद्र निमसे
अहिल्यानगर: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची राज्य कार्यकारी मंडळाची महत्त्वपूर्ण सभा प्रथमेश मंगल कार्यालय,टिटवाळा पूर्व (कल्याण) येथे पार पडली.
या सभेमध्ये अनेक प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत राज्यसरकार गांभिर्यपूर्वक विचार करत नसल्यामुळे लवकरच राज्यभर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली .
या सभेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे होते.यावेळी राज्य सल्लागार सुरेश भावसार,विश्वनाथ सूर्यवंशी,राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे,वरिष्ठ राज्यउपाध्यक्ष किरण पाटील, दीपक भुजबळ,संतोष कदम, प्रमोद पाटील,राजेंद्र निमसे, विजय मन्वर,माया चाफले, महादेव देसाई,भगवान पाटील यांच्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेत शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर सखोल चर्चा झाली. या चर्चेत संचमान्यता रद्द करण्यासाठी जिल्हावार न्यायालयीन प्रक्रिया सुरू करून आंदोलनाचा निर्णय घेणे, बीएलओची कामे राज्य शासनाने अशैक्षणिक म्हणून जाहीर केलेली असतानाही ती बंधनकारक असणे ,शिक्षण सेवक पद रद्द करणे किंवा त्यांचा कार्यकाल मर्यादित करणे,समान काम समान वेतन धोरणानुसार मानधन वाढ करणे,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक आणि विस्तारअधिकारी या रिक्त पदांची तात्काळ भरती करणे,पदवीधर शिक्षकांना अतिरिक्त न ठरविणे,सर्व शिक्षकांना सरसकट बारा वर्षाची वरिष्ठ व २४ वर्षाची निवड वेतनश्रेणी लागू करणे,शालेय पोषण आहाराच्या प्रलंबित देयकांची मंजुरी व यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे,केंद्रप्रमुख पदासाठी परीक्षा दोन वर्षांपूर्वी फॉर्म भरल्यानंतरही न घेता आलेली असून ती तात्काळ घेण्यात यावी, दहा वीस तीस ची आश्वासित पदोन्नती योजना शिक्षकांना तत्काळ लागू करावी.
,एम एड, नेट सेट व पीएचडी या उच्चाशिक्षित शिक्षकांना विनाविलंब प्रशासकीय सेवेत समाविष्ट करणे, शिक्षकांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना तात्काळ लागू करणे आदी मागण्यांबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी,यासाठी संघटनेमार्फत शासनाकडे ठोस निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयाचे स्वागत अखिल
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे, राज्यसंघटक बाळासाहेब कदम, संघाचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर ,ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण,संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हाकार्याध्यक्ष विलास लवांडे, जिल्हाकोषाध्यक्ष सुधीर बोऱ्हाडे, ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले,जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर रणदिवे, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर, उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, जिल्हासरचिटणीस शिवाजी ढाकणे,डीसीपीएस चे जिल्हाध्यक्ष संदीप भालेराव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिता उदबत्ते, संघाचे नगर तालुकाध्यक्ष पांडुरंग देवकर , संघाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष भारत शिरसाठ आदींनी केले आहे .


