चिचोंडी पाटील सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संदिप आबासाहेब कोकाटे व व्हा.चेअरमनपदी काशीनाथ वाडेकर यांची बिनविरोध निवड..

चिचोंडी पाटील सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संदिप आबासाहेब कोकाटे व व्हा.चेअरमनपदी काशीनाथ वाडेकर यांची बिनविरोध निवड..

         चिचोंडी पाटील सेवा सोसायटीचे मा.चेअरमन महादेव खडके व व्हा.चेअरमन सौ.अलका अर्जुन वाडेकर यांनी राजीनामा दिला होता.त्यामुळे सेवा सोसायटीच्या रिक्त असलेल्या चेअरमनपदी श्री संदिप आबासाहेब कोकाटे व व्हा.चेअरमनपदी श्री.काशिनाथ वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. 

         या निवडीबद्दल त्यांचा सन्मान मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे,सरपंच शरद पवार, मा.सरपंच मच्छिंद्र खडके,शिवसेना नेते डॉ.ययाती फिसके,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे,शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे,मा.सरपंच शंकर पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

         यावेळी मनोगत व्यक्त करताना मा.सभापती प्रविण कोकाटे,सरपंच शरद पवार,डॉ.ययाती फिसके,मच्छिंद्र खडके आदींनी यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत नूतन पदाधिकाऱ्यांना संस्थेचे हित जोपासण्याचे आवाहन केले.

       यावेळी मा.सरपंच राजुशेठ हजारे,मा.सरपंच पांडुरंग कोकाटे,मा.चेअरमन विठ्ठलदेवा कोकाटे,मा.सरपंच दिलीप पवार,मा.व्हा.चेअरमन डॉ.मारुती ससे,सुरेश ठोंबरे,काशीनाथ बेल्हेकर संचालक पंडितराव कोकाटे,अंबादास फिसके,चंद्रकांत सदाफूले,कासमशेठ सय्यद,महेश जगताप पा.,बबन कोकाटे,उपसरपंच विश्वसागर कोकाटे,भाऊसाहेब ठोंबरे,महादजी कोकाटे,ग्रा.पं.सदस्य प्रशांत कांबळे,संदीप काळे,ज्ञानेश्वर ठोंबरे,दत्तू धुळे,पै.राजु कोकाटे,भाऊसाहेब वाडेकर,ह.भ.प.बाबासाहेब परकाळे,विकास कोकाटे सर,कल्याण ठोंबरे सर,संदीप सुरवसे,अरुण दवणे,सर्जेराव ठोंबरे,नानासाहेब कोकाटे,आनंदा मुटकुळे,अनिल सुरवसे,राम कोकाटे,संतोष पवार,गोविंद मांढरे,रामदास जाधव,गणेश वाडेकर,सुनील कोकाटे,गणेश कोकाटे,अनिल चव्हाण,अविनाश कोकाटे,बबन कळमकर,नितीन वाडेकर,मंगेश कोकाटे,सचिव दत्ता झांबरे,संतोष कोकाटे,प्रशांत लबडे,मायंजी कोकाटे,रावसाहेब कोकाटे,सुभाष कोकाटे , प्रशात कोकाटे आदींसह सभासद व ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

       मा.चेअरमन महादेव खड़के व डॉ.मारुती ससे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *