श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूर ला प्रस्थान
अहमदनगर -महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींची पालखी राहुरी येथून सीमोलंघन सोहळ्यासाठी आज शनिवार दि 30सप्टेंबर 2023 रोजी श्री तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आली
माजी.आ. शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते या वेळी श्री तुळजाभवानी देविंजींच्या पालखीची पूजन व आरती करण्यात आली. ,पालखीचे मुख्य पुजारी व मानकारी सागर भगत, सुदाम भगत, ज्ञानेश्वर भगत, शिवराम भगत,देविदास भगत, मंगेश भगत , वसंत भगत , निखिल भगत , विशाल भगत , तसेच तेली समाजाचे अध्यक्ष संजय पन्हाळे , सुरेश धोत्रे , भाऊसाहेब इंगळे , चाचा तनपुरे , आणा शेटे , गणेश खैरे , सुरेश बानकर , नारायण घोंगडे ,विक्रम तांबे. बाळूनाना बानकर. शरद येवले ,सचिन मेहेत्रे सुभाष वराळे.उमेश शेळके. विक्रम भुजाडी.सुजय काळे, मकरंद कुलकर्णी , किरण भालेकर आदीची यावेळी उपस्थति होती देवीजींच्या सीमोलंघन सोहळ्यासाठी पालखी तयार करण्याचा व आण्यासाठी अनेक समाजाचा मान आहे .दरवर्षी पालखीसाठी लागणारे उभे लाकूड माळी मेहेत्र , इतर कामासाठी सागवान व बोरी चे लाकूड पालखीचे पटेल गायत्री स्वा मिल कडून घेतले जाते खांद्या साठी जो मोठा दांडा लागतो तो पूर्वीपासून जुनाच वापरला जातो संपूर्ण लाकूड गोळ्या झाल्यानंतर ती पालखी तयार करण्याचा मान कै उमाकांत सुतार घराण्याकडे असून सध्या त्यांचे वंशज अरुण सुतार हे मानकारी आहेत .लाकडाची कताई करण्याचे काम धनगर समाजाचे भांड घराणे तर खिळे पट्टी करण्याचे काम हे लोहार समाजाचे रणसिंग घराण्याकडे आहे संपूर्ण पालखी तयार झाल्यावर खन नारळांनी पालखीची ओटी भरून भंडारा उधळण करुण आई राजा उदो उदो करून या जय घोषात पालखी राहुरी येथून तुळजापूर ला रवाना करण्यात येते . तुळजापूर येथील शुक्रवार पेठेत पलंग पालखी कट्ट्यावरती जानकोजी भगत यांच्या समाधी शेजारी आणण्यात येते तेथे पलंग पालखीची पूजन झाल्यानंतर मंदिर संथान कडून मनाचा एक रुपया व नारळ देऊन सोमोलंघनासाठी आमंत्रण देण्यात येते हि पालखी वाजत गाजत साधारण पहाटे 4 वाजे पर्यंत मंदिरात येते व या पालखीत देविंजिचा सीमोलंघन सोहळा संपन्न होतो