जिल्ह्याचे पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापतींसह जिल्ह्यातील* 

*महायुतीच्या आमदारांचा रविवारी नगरमध्ये सत्कार सोहळा* 

जिल्ह्याचे पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापतींसह जिल्ह्यातील
महायुतीच्या आमदारांचा रविवारी नगरमध्ये सत्कार सोहळा
अहिल्यानगर – जिल्ह्याचे पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती, व महायुतीचे नवनिर्वाचीत आमदार यांचा सत्कार समारंभ रविवार दि.२३ मार्च रोजी सकाळी ११.०० वा.यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, स्टेशन रोड, येथे नगर तालुका महायुतीच्या वतीने आयोजीत करण्यात आला असल्याची माहीती आ. शिवाजीराव कर्डीले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले यांनी पत्रकार परीषदेमध्ये दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मुर्ती जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन व नगर राहुरी मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डीले राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. मोनिकाताई राजळे, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ. किरण लहामटे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ.अमोल खताळ या जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सन्मान करण्यात येणार आहे
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे महानगर अध्यक्ष अभय आगरकर, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, सुनिल साळवे, संपत बारस्कर, सुरेंद्र थोरात आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले, तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ यांच्या वतीने करण्यात आले.
या पत्रकार परिषदेस सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, दिलीप भालसिंग, दिपक कार्ले, संतोष म्हस्के, दिपक लांडगे, रेवणनाथ चोभे, धर्मनाथ आव्हाड, सुधीर भापकर, अभिलाष घिगे, सुभाष निमसे, बाजीराव हजारे, भाऊसाहेब ठोंबे, महेश वाघ आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *