आयुष्यमान आरोग्य मंदिर सडे येथे जागतिक कर्करोग दिन साजरा

आयुष्यमान आरोग्य मंदिर सडे येथे जागतिक कर्करोग दिन साजरा 

राहुरी -आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला .यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ. ज्योती कोहकडे  यांनी विविध प्रकारच्या कर्करोगाची लक्षणे कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, तपासणी, उपचार पद्धती, योग्य आहार याबद्दल मार्गदर्शन केले. आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी मोनालिसा पंडित  यांनी कर्करोगाबद्दल जनजागृती करून उपस्थित सर्व महिलांना व्हीआयए चाचणीचे महत्त्व सांगीतले. सर्वांना चाचणी करण्यास प्रवृत्त करण्यात आले. आरोग्य सेविका ज्योती तोडमल यांनी आभार मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी आशा सेविका आशा जाधव, सुरेखा गोरे, सुरेखा रुपनर, सपना गायकवाड आशा सुपरवायझर निलम बाचकर व ललिता खेमनर यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *