लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होणार
महाआघाडीची सत्ता राज्यामध्ये येणार
निळवंडे कालव्यासाठी किती निधी आणला याचा हिशोब शिवाजी कर्डिलेंनी द्यावा.
राहुरी :
महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये येणारच आहे. ज्याप्रमाणे लोकसभेला जनतेने आपल्या मतदानातून भाजप व मित्र पक्षाला जागा दाखविली त्याच निकालाची पुनरावृत्ती विधानसभेतही दिसणार आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्तांतर घडणार आहे. व यामध्ये युवक तरुण महिला हे सगळे जण त्यात अग्रेसर असणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे
आमदार तनपुरे यांचा कनगर ( ता. राहुरी ) येथे प्रचार दौरा होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच दत्तात्रय गाढे होते.
पुढे बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, कनगर गावाचं आणि माझं एक वेगळे भावनिक नातं आहे. उद्घाटन करण्यापेक्षा काम करण्यात मला जास्त आवड आहे. विरोधक हे फक्त भाषणबाजी करतात. प्रत्यक्षात त्यांचे काम शून्य आहे. मतदार संघामध्ये दहा वर्षांमध्ये त्यांनी एक तरी भरीव काम दाखवावे. भविष्यामध्ये शेतीसाठी दिवसा वीज देण्याचे काम करायचे आहे. राहुरी मतदार संघाला पन्नास वर्षानंतर मंत्री पदाची संधी मिळाली. या मायबाप जनतेमुळेच मी मंत्री झालो हे कदापि विसरणार नाही. मंत्री पदाचा वापर हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. निळवंडे कालव्यासाठी त्याच्या सरकारच्या काळात किती निधी आणला याचा हिशोब शिवाजी कर्डिलेंनी द्यावा. भाषणाच्या पलीकडे काही केले नाही त्यांनी जनतेला फक्त झुलवत ठेवण्याचे काम केले.
माझ्या मंत्री पदाच्या काळात मतदारसंघांमध्ये भरून निधी आणण्याचे काम केले. तुमच्या काळात शेतकऱ्यांना ट्रांसफार्मर विकत घ्यावे लागत होते. तुमच्या काळातील एखादी तरी भरीव काम दाखवा. महाविकास आघाडी सरकारने लाडक्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतीमालाचे भाव पाडण्याचे काम केले. दुधाचे दर कोसळले. अनेक योजनांना ब्रेक लावण्याचे काम केले. पुढील पाच वर्षात आपल्याला दिवसा वीज देण्यासाठी काम करायचे आहे. सौर प्रकल्पाचे नियोजन आहे. थोडीफार विकास काम आहे त्यांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. आपले सरकार आल्यावर दिवसा वीज, निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या चारी ची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन रस्त्यांची कामे चालू करायची आहेत. या सरकारने निवडणुका लागल्यावर लाडकी बहीण योजना बंद केली आहे.
यावेळी बाळासाहेब आढाव, बाबासाहेब सोनवने, रामदास बाचकर,अमोल हरिचंद्रे, गोरक नालकर, दत्तात्रय गाढे, सोन्याबापू उ-हे, सुयोग नालकर, अनिल घाडगे, नवनाथ मुसमाडे, भाऊसाहेब आडभाई, संकेत जाधव, सिराज इनामदार, मच्छिंद्र वरघुडे, भाऊसाहेब पटेकर, मच्छिंद्र वरघुडे, धनंजय बर्डे, राजेंद्र दिवे, किशोर दिवे, रावसाहेब जाधव, बन्सी जाधव, भाऊसाहेब दिवे, रघुनाथ गाढे, राजेंद्र आडभाई,संकेत जाधव, आदित्य घाडगे, बाळासाहेब भुजाडी आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.