-शिक्षणमंत्री दादा भुसे
प्राथमिक शिक्षकांच्या सर्व समस्यांचा टप्प्याटप्प्याने निपटारा होणार
-शिक्षणमंत्री दादा भुसे
शिक्षणमंत्री यांनी राज्यातील संघटना प्रतिनिधीं समवेत बैठकीत दिले स्पष्ट आश्वासन
-राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांची माहिती
मुंबई-आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधी यांचेशी संवाद साधला.यावेळी शिक्षणमंत्री भुसे यांनी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचा टप्प्याटप्प्याने संपूर्णपणे निपटारा करणार असल्याचे स्पष्ट आश्वासन या संयुक्त बैठकीत दिल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली .
जयहिंद कॉलेज,चर्चगेट(मुंबई) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत शिक्षणमंत्री यांच्या समवेत राज्याचे शिक्षणसचिव रणजितसिंह देओल,शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह,एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी , शिक्षण उपसचिव तुषार महाजन ,माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदी प्रशासकीय अधिकारी यांचेसह अखिल संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , इष्टा संघटनेचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर,आबासाहेब लोंढे,आबासाहेब जगताप या बैठकीस उपस्थित होते .
शिक्षण विभागाची सुत्रे हाती घेताच शिक्षणमंत्री ॲक्शन मोडवर आले असून विद्यार्थी गुणवत्ता, शिक्षकांचे प्रश्न ,शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे .
यावेळी शिक्षक संघटना प्रतिनिधी यांनी आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपाययोजना सुचवल्या .तसेच शिक्षकांच्या समस्या मंत्रीमहोदया समोर मांडल्या.हे सर्व प्रश्न समजून घेवून ते सोडवण्यासाठी आगामी काळात नियोजन करण्यात येईल. हे सर्व प्रश्न एकाच वेळी सुटतील अशी खात्री मी देत नाही,परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील व आगामी काळात त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित दिसतील असे स्पष्ट आश्वासन शिक्षण मंत्री यांनी दिले.ग्रामीण भागातील शाळांचे पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने व गुणवत्ता पूर्ण आनंददायी शिक्षण राबवण्याच्या दृष्टीने शिक्षक संघटनाची भूमिका महत्त्वाची आहे,असे सांगितले.
यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशैक्षणिक कामे,बीएलओचे काम पूर्णपणे वगळणे व दररोजची ऑनलाईन कामे कमी करणे,शिक्षकांना फक्त शिकवू द्या,शालेय पोषण आहार योजने अन्य यंत्रणेकडे देऊन त्यातील त्रुटी दूर करणे,शालेय समित्यांची पूनर्रचना करणे,राज्यातील शालेय कामाच्या दिवसातील विषमता दूर करणे ,नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी,१५ मार्च २०२४ संचमान्यता शासन निर्णय,आधारवर आधारित संचमान्यता , जिल्हया -जिल्हयातील विविध शैक्षणिक उपक्रम रद्द करून राज्यात एकच पथदर्शी उपक्रम विद्यार्थी हिताच्या दृष्टीने राबविणे, असे अनेक प्रश्न शिक्षक संघटनांनी मांडले.ते सर्व प्रश्न स्वतः शिक्षणमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांनी लिहून घेवून सर्व संघटनांचे निवेदन स्विकारले.ही बैठक अंतिम नसून ठराविक कालावधी नंतर शिक्षक संघटनांशी नियमित संवाद साधून या बाबींवर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल,असेही ते म्हणाले.
या निर्णयाचे स्वागत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे ,राज्य सल्लागार प्रकाश दळवी,सुरेश भावसार,विश्वनाथ सूर्यवंशी, राज्यकार्याध्यक्ष अण्णाजी आडे,राष्ट्रीय संयुक्तसचिव तथा राज्यकोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर,राज्य महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला बोंडे,वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील,राज्य विभाग प्रमुख प्रमोद पाटील,दीपक भुजबळ,भगवान पाटील,दिगंबर जगताप,सुनील हाके,केशव बोर्डे,महादेव देसाई , अनिल महाजन,हरिदास घोगरे, लालासाहेब मगर,विजय मन्वर , शिवानंद सहारकर,महेश देशमुख,संध्या ठाकरे,रवींद्र काकडे, कृष्णा चिकणे,प्रशांत पारकर,मायावती चापले,डी एस कोल्हे,दिलीप देवकांबळे, संगीता पांगुळ,शुभांगी कचरे,विलास आळे,राजा कविटकर,शांताराम पाटील, बाळासाहेब कदम,कांचन कडू ,सविता पिसे, गुरुदास कुबल,जयवंत काळे,आशाताई झिलपे,विजय पंडित,किशोर चौधरी,संतोष लोहार,ज्योती कुडाळकर,शिवाजीराव वाळके, लोकेश गायकवाड यांच्यासह अहिल्यानगर संघाचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर,ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण,सुनील शिंदे, विलास लवांडे,सुधीर बोऱ्हाडे, सुरेश नवले ,सुधीर रणदिवे, दत्तात्रय परहर,मधुकर डहाळे, रज्जाक सय्यद,संदीप भालेराव,अनिता उदबत्ते, संगीता घोडके,संगीता निमसे, संगीता निगळे,उज्वला घोरपडे, यांनी स्वागत केले आहे .