आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली.

आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली.

समितीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा निर्धार. 

प्रतिनिधी : अहिल्यानगर 

आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी भानुदास कोतकर, उपाध्यक्षपदी  संदीप गेरंगे, समन्वयक म्हणून ॲड. राहुल ठाणगे यांची निवड जाहीर करण्यात आली.

आत्मनिर्धार फाऊंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन समितीची बैठक रविवारी ( दि .२२ डिसेंबर ) आझाद वाचनालय येथे पार पडली. यावेळी फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा अध्यक्ष महादेव गवळी यांनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच आगामी काळात पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचा ठराव मांडला. पर्यावरण संवर्धन समितीच्या कृती कार्यक्रमाची आखणी व धोरणात्मक बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पहिल्या टप्प्यात २०० फळ झाडे, औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन करण्याचा निर्धार सभासदांनी केला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास कोतकर, संदीप बांगर  ज्योतिष अभ्यासक संतोष घोलप, कैलास लांडे, आसाराम लोंढे, सुदाम घोडके यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजना करणे आवश्यक :  कोतकर

देशभरात प्रदूषण ही मोठी समस्या निर्माण होत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे पर्जन्यमानात अनपेक्षित बदल होताना दिसत आहे. त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने नवीन आणि गंभीर समस्यांचे आव्हान यापुढील काळात आपल्यासमोर येणार आहे, त्यावर मात करण्यासाठी आपण सावध भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. येत्या काळातील पर्यावरणीय समस्यांचा सामना करण्यासाठी पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली असल्यानेच आत्मनिर्धार पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत पर्यावरण संवर्धन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष भानुदास कोतकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *