वनसंवर्धन व जलसंवर्धन करणाऱ्या गावांना पाठबळ देणार -आमदार काशिनाथ दाते सर 

वनसंवर्धन व जलसंवर्धन करणाऱ्या गावांना पाठबळ देणार -आमदार काशिनाथ दाते सर 

हिवरे बाजार : प्रतिनिधी

      दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी नवनिर्वाचित आमदार २२४ पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ काशिनाथ दाते सर यांनी मतदारांचे आभार प्रदर्शन दौरानिमित्ताने आदर्श गाव हिवरे बाजारला भेट देऊन पद्मश्री पोपटराव पवार यांची भेट घेतली.

आमदार दाते पुढे बोलताना म्हणाले,तापमान बदलाचे दुष्परिणाम जगभर होत आहेत त्यामुळे वृक्षारोपण व जलसंधारणामध्ये आणखी काम करण्याची गरज आहे त्यासाठी पद्मभूषण आण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धी व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजार या गावात तसेच भाळवणी,पिंपरी जेलसेन,पिंपरी गवळी या गावांनी चांगले काम केले आहे. राजकारणापेक्षा मानवी मूल्यांचे राजकारण माझ्या दृष्टीने म्हत्वाचे असून निसर्गसंवर्धन करणाऱ्या गावांसाठी राळेगणसिद्धी व हिवरे बाजार हे प्रेरणास्त्रोत आहेत.आदरणीय आण्णासाहेब हजारे व पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन घेऊन पर्यावरण,पाणी,स्वच्छता,व्यसनमुक्ती व आदर्श गावांची सप्त्सुत्रीचे पालन करणाऱ्या गावांना प्रधानान्याने पाठबळ दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हिवरे बाजार ग्रामस्थांनी स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी न करता त्यांचे हस्ते प्रवेशद्वाराजवळ वृक्षारोपण करण्यात आले आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्यासमवेत वसंतराव चेडे होते.कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे,चेअरमन छबुराव ठाणगे,व्हा चेअरमन जालिंदर चत्तर, मीनाताई गुंजाळ ग्रा.पं.सदस्य, रो.ना.पादीर ग्रा.पं.सदस्य,अर्जुन पवार,एस.टी.पादीर सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *