आहिल्यानगर – न्यु इंग्लिश स्कूल शेंडी ( ता. नगर ) शाळेतील खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली. या स्पर्धा २५ नोव्हेंबर रोजी काष्टी ता. श्रींगोदा येथे जिल्हा शालेय युनिफाईट स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये विदयालयातील
खालील खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली.समीक्षा दानवे- सुवर्णपदक, कृष्णा सरोदे -सुवर्णपदक, प्रांजली भंडारे -रौप्यपदक,ज्ञानेश्वरी राऊतळे -रौप्यपदक, द्विज गुंड – कांस्यपदक
वरील सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष विवेक भापकर, सचिव विश्वासराव आठरे सहसचिव जयंत वाघ, खजिनदार दिपलक्ष्मी म्हसे सर्व पदाधिकारी तसेच विदयालयाच्या मुख्याध्यापिका . एस . एस. शिंदे, बी.बी. मुळे पर्यवेक्षक बाळासाहेब भिसे, नजमा देशमुख यांनी अभिनंदन केले.
सर्व खेळाडूंना सुप्रिया झिने, वैशाली साखरे यांनी मार्गदर्शन केले.