*रुईछत्तिशी येथे साकारणार भव्य सहकार भवन..*
*वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालकांनी घेतला निर्णय…*
रुईछत्तिशी – हनुमान विविध विकास सेवा सहकारी सोसायटी , रुईछत्तिशी येथे रमेश भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा नियोजनात पार पडली. रुईछत्तिशी येथील बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चालली असताना संचालकांनी इमारत बांधून गाळे काढण्याचा निर्णय घेतला आहे. रुईछत्तिशी येथे सध्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले गटाच्या ताब्यात सोसायटीची सत्ता असून रमेश भांबरे चेअरमन म्हणून पदावर आहेत.रमेश भांबरे यांनी ग्रामपंचायत इमारत बांधून गाळे काढण्याचा निर्णय गेल्या २० वर्षापूर्वी घेतला त्याचाच परिणाम येथे भव्य बाजारपेठ उदयास आली.इमारत बांधत असताना सभासदांच्या कोणत्याही ठेवीवर त्याचा परिणाम होणार नाही. स्वनिधीतून इमारत व गाळे बांधले जाणार आहेत अशी माहिती चेअरमन रमेश भांबरे यांनी दिली.सर्व सभासदांनी आपले विचार मांडले या सर्व विचारावर सत्ताधारी संचालकांनी सडेतोड उत्तरे देऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सभेचे प्रास्ताविक माजी सरपंच , संचालक श्रीकांत जगदाळे सर यांनी केले.यावेळी व्हा. चेअरमन भरत भुजबळ , बाबासाहेब पवार , धनंजय खाकाळ , राजू लोखंडे , शंकर फुलमाळी , संजय खाकाळ , सुनिल जगदाळे , प्रविण गोरे , अंकुश गोरे , किरण भापकर , दिपक गोरे आदी संचालक व ग्रामस्थ , सभासद , आजी – माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालक मंडळांनी घेतलेला निर्णय सर्व ग्रामस्थांनी मान्य करून सोसायटीची होत असलेली इमारत यावर समाधान व्यक्त केले.सहकारातील सर्व प्रशासकीय बाबींची पोलखोल झाल्याने सभा चांगलीच गाजली.सभेची सांगता पसायदानाने झाल्याने नगर तालुक्यातील ही अशी पहिलीच सभा ठरली.