मतदानाच्या दिवशी बाजार समितीचे कामकाज बंद राहणार

मतदानाच्या दिवशी बाजार समितीचे कामकाज बंद राहणारअहमदनगर:- कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर कडून सर्व शेतकरी, हमाल ,मापाडी,आडते, खरेदीदार व इतर घटकाना कळण्यात येते की महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर निवडणुकीचे मतदान बुधवार दिनांक 20 /11/2024 रोजी होणार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे भुसार ,भाजीपाला, उप बाजार आवार नेप्तीचे सर्व कामकाज बंद राहणार आहे. तसेच गुरुवार दिनांक 21 /11/2024 रोजी पासून सर्व कामकाज नियमित चालू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कांदा शेतमाल विक्रीसाठी गुरुवार दिनांक 21/11/2024 रोजी  उपबाजार आवार नेप्ती येथे यार्डवर आणावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी केले. तसेच सर्व मतदारांनी आपले मतदानाचे हक्क बजावावे असे आव्हान बाजार समितीचे सभापती श्री.भाऊसाहेब नानासाहेब बोठे  बाजार समितीचे उपसभापती श्री. रभाजी मुक्ताजी सुळ यांनी केले .यावेळी सर्व संचालक ,सचिव ,सहायक सचिव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *