नगर तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र कोठुळे

अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या  नगर तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र कोठुळे यांची निवड

अहिल्यानगर – 

अखिल महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या नगर तालुका अध्यक्षपदी संदीप पुंड, उपाध्यक्षपदी राजेंद्र कोठुळे, सचिवपदी करीम बेग, कार्याध्यक्षपदी मनोहर काळे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. 

अखिल महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनची नुकतीच बैठक पार पडली. याबैठकीमध्ये नगर तालुक्यातील कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या. कार्यकारिणीत नगर तालुका अध्यक्षपदासाठी संदीप गुंड यांचे नाव सुचविण्यात आले. तर उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र अशोक कोठुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर सचिवपदी करीम बेग, कार्याध्यक्षपदी मनोहर काळे यांच्या निवडी करण्यात आल्या. अखिल स्तरीय महार्आनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या नगर तालुका कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या सर्वांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.   दरम्यान, वरिष्ठांनी संघटनेत काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जावू न देता नगर तालुक्यातील महाऑनलाईन केंद्र (सेतू केंद्र) संचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोठुळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *