जवाहर नवोदय विद्यालयात बाबुर्डी घुमटचे दोन विद्यार्थीची निवड
तिन वर्षापासून या जिल्हा परीषद शाळेचे विद्यार्थी ची निवड होते
जादा तास घेऊन तब्बल १२६ प्रश्नपत्रिका विद्यार्थीकडून सोडवून घेतल्या
निंबळक – जवाहर नवोदय विद्यालयात बाबुर्डी घुमटचे दोन विद्यार्थीची निवड झाली आहे. गेल्या तिन वर्षापासून या जिल्हा परीषद शाळेचे विद्यार्थी ची निवड नवोदय विद्यालयात होत आहे . येथील शिक्षकांनी जादा तास घेऊन तब्बल १२६ प्रश्नपत्रिका विद्यार्थीकडून सोडवून घेतल्यामुळे या शाळेची गुणवत्तेत वाढ होत आहे.
या शाळेतून या वर्षी तन्वी राजू उंडे व अंजली शिवाजी चव्हाण या विद्यार्थिनींनी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला.प्रवेश मिळविला. वर्गशिक्षक प्रिती वाडेकर, मुख्याध्यापक नंदू धामणे यांनी वर्षभर जादा तासिका घेतल्या तसेच मार्गदर्शन करणारे शाळेतील शिक्षक आबासाहेब लोंढे, संजय दळवी, राजेंद्र काळे, हेमलता नागपुरे, वर्षा कासार, सोहनी पुरनाळे, अपर्णा आव्हाड पालक,यांच्या अथक परिश्रमातून हे यश मिळाले. वर्षभरात प्रेरणा, स्कॉलर, नवनीत, अथर्व श्री, यशोदीप या सारख्या अनेक प्रकाशनाचे सराव संच वापरून तब्बल १२६ प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेण्यात आल्या. तसेच सलग तीन वर्ष नवोदय प्रवेशाची हॅट्रिक साधन्याचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील बाबूर्डी घुमट शाळेने केल्याबद्दल
नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला साठे अरणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख उदयकुमार सोनावळे, सरपंच नमिताताई पंचमुख, उपसरपंच ज्योतीताई परभाणे, तानाजी परभाणे, पवन लांडगे, भाऊसाहेब चव्हाण,शहाबाई मुजाळ , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परभाणे, उपाध्यक्ष सचिन भगत, आदी ग्रामस्थ व पालक यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.