शिवाजीराव कर्डिलेंसाठी संघर्ष हेच जीवन, वैयक्तिक त्रास विसरून जनतेसाठी अविरत कार्यरत

शिवाजीराव कर्डिलेंसाठी संघर्ष हेच जीवन, वैयक्तिक त्रास विसरून जनतेसाठी अविरत कार्यरत

नगर: राजकारण हा अक्षरशः २४ तास करावं लागणार काम आहेत असे म्हणतात. सार्वजनिक जीवनात तुम्ही कायम लोकांसाठी उपलब्ध असले पाहिजे असे अपेक्षित धरलं जाते अन्यथा तुमच्या लोकप्रियतेला ओहोटी लागते. असच काहीसं अक्षरशः २४*७ राजकारण तेही कायम लोकहिताचे करणारे राजकारणी म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची ओळख आहे. ३० वर्षांच्या विधानसभा निवडणुकीच्या वाटचालीतील एकमेव पराभवाचा डाग पुसून काढण्याचा विडा उचलून आज वयाच्या ६८ व्या वर्षीही स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता कर्डीले राहुरी मतदारसंघात पायपीट करत आहेत. राहुरीत नुकत्याच झालेल्या अतिभव्य प्रचार फेरीत पायातून रक्त आले, प्रचंड वेदना होत होत्या. तरीही कर्डिले यांनी चेहऱ्यावर ते जाणवू न देता लोकांशी संवाद चालूच ठेवला. मूळचा पिंड संघर्ष, कष्टाचा असल्याने राहुरीतील प्रचार आटोपताच जराही विश्रांती न घेता ते इतरत्र प्रचारात सक्रिय झाले. मूळचे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांना संघर्ष म्हणजे काय ते नवीन नाही. हाच संघर्ष त्यांना पुन्हा एकदा नव्या विजयाकडे नेणारा ठरू शकतो.

प्रस्थापितांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्याच्या राजकारणावर नेहमीच साखर सम्राट, शिक्षण सम्राट यांचा पगडा राहीला आहे. सर्वसामान्यांनी झेप घेतली तरी त्यांच्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि फार झाले तर जिल्हा परिषद. अशा वातावरणात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी अक्षरशः सायकलवर दूध विकण्याचे काम केले. तो कुटुंबासाठीचा संघर्ष होता. पुढे लोकांमध्ये राहुन आपल्या समदुःखीचे प्रश्न सोडविण्यासाठी ते राजकारणात सक्रिय झाले. लोकांनाही कोणीतरी आपल्यातील हवाच होता. कर्डिलेंचीही संघर्षाची तयारी होतीच. पैलवान गडी असल्याने प्रसंगी दोन हातही करण्याची मानसिकता होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य कष्टकरी वर्गाबद्दल आत्मियता आहे. परिणामी सलग पाच वेळा त्यांनी विधानसभेचे मैदान मारले. 2009 ला मतदारसंघ पुनर्रचना झाली.  वर्षानुवर्षे मशागत केलेला मतदारसंघ विखुरला गेला. पण हार मानतील ते कर्डीले कसले. दाढीवाले कर्डीले टोपीवाले बनून दिग्गजांशी दोन हात करण्यास सज्ज झाले. जनसामान्यांचे पाठबळ असल्याने नवख्या राहुरी मतदारसंघातही त्यांनी सलग दोन वेळा आमदारकी मिळवलीच. अनेक दिग्गजांच्या डावपेचांना ते पुरून उरले. 

या काळात कर्डीले यांनी राजकारणाची नवीन पद्धत रूढ केली. दररोज सकाळी ७ वाजता आपल्या बुर्हाणनगर येथील निवासस्थानी जनता दरबार भरवायचा.‌आलेल्या प्रत्येकाचे प्रश्न समजून त्याचा निपटारा करायचा आणि नंतर लगेच गावोगावी भैटीगाठी सुरू करायच्या. या अविरत प्रवासात त्यांनी कुटुंबांसाठी पुरेसा वेळ दिला नाही. आजही त्यांच्यासाठी त्यांच्या प्रेम करणारी जनताच मोठं कुटुंब आहे. त्यामुळेच वयाचा, शारीरिक व्याधींचा, कष्टांचा विचार न करता ते आजही आपल्या माणसांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवून मागील दोन अडीच महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

मी हाडाचा शेतकरी, संघर्ष काय असतो हे माहिती आहे 

अविरत संघर्षाबाबत बोलताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले सांगतात, मी हाडाचा शेतकरी आहे. शेतात राबणे, दुग्ध व्यवसाय सांभाळणे अशी कामे करताना पदोपदी संघर्ष करावा लागतो.‌तरूण वयात पैलवानकी केल्यानं आज या वयातही शारीरिक व्याधींना यशस्वी रित्या तोंड देतो. मला कोणत्याही निवडणूकीत संघर्षाशिवाय यश मिळाले नाही. पण या काळात मला जनतेने भरपूर साथ दिली. त्यांच्या ऊर्जेमुळे स्वतःचे दुखणे विसरून लढायला बळ मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *