राज्यामध्ये लाडकी बहीण ऐवजी सुरक्षित बहीण योजनेची गरज

राज्यामध्ये लाडकी बहीण ऐवजी सुरक्षित बहीण योजनेची गरज

महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके 

 मतदारसंघातील गावागावात महिला व ग्रामस्थांशी संवाद 

पारनेर – प्रतिनिधी 

   महायुती सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजनांची खैरात करत राज्य दिवाळ- खोरीकडे नेले असून दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र अडगळीत टाकला आहे.

राज्यांतील महिलांवरील अत्याचार व अन्यायाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली असून लाडकी बहिणी योजने ऐवजी माझी सुरक्षित बहीण योजना राबविण्याची गरज असल्याचे मत महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ राणीताई लंके यांनी वडझिरे येथे व्यक्त केले आहे.

  तर दुसरीकडे ग्रामीण भागातील आजही महिलांच्या सुरक्षा शिक्षणाचे आरोग्याचे प्रश्न भेडसावत असुन विधानसभा निवडणुकीत पारनेरच्या इतिहासात एक महिला उमेदवार म्हणून मला संधी मिळाली आहे. त्यामुळे या ग्रामीण भागातील शिक्षण आरोग्य यांसह इतर प्रश्न सोडवण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ राणीताई लंके यांनी सांगितले. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात १४ दिवस वाड्या वस्त्यांवरील मतदारांशी संवाद व घोंगडी बैठक घेण्याचा सपाटा महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ राणीताई लंके यांनी लावला असून गावासह वाड्या वस्त्यांवर जाऊन थेट महिलांशी ज्येष्ठ व मतदारांशी ते संवाद साधत आहे.

    यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी सेवा संस्थेचे चेअरमन भीमा दिघे माजी उपसरपंच बाळासाहेब दिघे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी अनिल गंधाक्ते पोपट शेटे आनंदा चौधरी प्रकाश मोरे शिवाजी मोरे किसन गंधाक्ते अण्णा मोरे लक्ष्मण दिघे अतुल मोरे भाऊजी एरंडे आनंदा चौधरी यांच्या सह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

  यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार लंके म्हणाल्या की खासदार निलेश लंके यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या मूलभूत गरजांसाठी कोट्यवधी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे माझ्या माध्यमातून पाणीच्या इतिहासात पहिली महिला आमदार विधानसभेत जाणार असून महिलांच्या प्रश्नासाठी व महिलांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी निश्चितच चांगले काम करण्याचा शब्द सुद्धा राणीताई लंके यांनी दिला आहे.तर सर्वसामान्य महिलांसाठी किंवा इतर तळागाळातील ज्या योजना आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचा शब्द सुद्धा राणी लंके यांनी दिला आहे. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हरिभाऊ चौधरी यांनी केले तर आभार अनिल गंधाक्ती यांनी मानले.

कोट – आघाडीचा घटक शिवसेना पक्ष लंके बरोबर 

उबाठा तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे 

शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द हा अंतिम असून त्यांच्या आदेशानुसार आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार सौ राणीताई निलेश लंके यांच्या प्रचारात आम्ही सक्रिय झालो असुन निवडुन आणणार आहे. तर गेल्या अनेक दिवसापासून आमच्यामध्ये मतभेद असल्याचे चित्र निर्माण केले गेले परंतु घटक पक्ष म्हणून राणीताई लंकेला निवडून आणण्याची जबाबदारी आमची असल्याचे प्रतिपादन उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे व महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *