माझी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर : काशिनाथ दाते
शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
पारनेर/प्रतिनिधी
जवळा ता. पारनेर येथे महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते सर यांच्या गावभेट दौऱ्यात झालेल्या छोट्याशा सभेत दाते सर बोलत होते. पारनेर-नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटल्यानंतर माझी उमेदवारी निश्चित होताच सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीची मदत मला झाली. पारनेर तालुक्यातील भाजपाची संघटना अतिशय मजबूत असून भाजप नेत्यांनी माझ्या प्रचारालाच सुरुवात केली तर नगर तालुक्यातील प्रचारात मला प्रकर्षाने जाणवले माझ्या निवडणुकीच्या विजयात माझ्या महिला भगिनींचा सर्वात मोठा वाटा असणार आहे. यावेळी काशिनाथ दाते यांच्या समवेत भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादीचे प्रथम जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, सभापती गणेश शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, सचिन पाटील वराळ, पंकज कारखिले, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्षा सोनाली सालके, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, नवनाथ सालके, कृष्णाजी बडवे यांसह स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
काशीनाथ दाते यांनी उपस्थित शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “आम्ही शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी नेहमी तयार आहोत. आमचा प्रचारदौरा या भागातील विकासासाठी आणि शेतकरी कल्याणासाठीच आहे. अजित दादांनी केलेली अतिशय लोकप्रिय घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी या योजनेवर अतिशय खुश आहेत. महिलांच्या चेहऱ्यावर मला ते प्रकर्षाने जाणवत असून या सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. म्हणून हे सरकारला पुन्हा एकदा निवडून येणार आहे केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यास राज्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी स्वभावाने शांत असलो तरी अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही. मी निवडणुकीला उभे राहू नये म्हणून अनेक अडथळे निर्माण केले माझ्यावर बालंट आणण्याचे प्रकार केले. खोटेनाटे आरोप माझ्यावर केले, माझ मनोधैर्य खचविन्याचेही प्रयत्न झाले. मला निवडणुकीतून बाजूला करण्याचा डाव रचला, परंतु मला विश्वास आहे माझ्यावर कितीही आरोप केले तरी माझी पारनेरची जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही. मी जाहीरपणे सांगतो कोणत्याही दमबाजीला घाबरू नका. आपण खंबीर व्हा, आमदार पदाचा वापर सर्वसामांन्याच्या हितासाठी सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी करावा लागतो.
🔸 चौकट : उमेदवारी जाहीर होताच पारनेर भाजपची संपूर्ण यंत्रणा सर्व शक्तीनिशी महायुतीचे उमेदवार म्हणून काशिनाथ दाते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असून सरांच्या विजयातच आपला सर्वांचा विजय सामावलेला असल्याने मतदान होईपर्यंत आपण सर्वांनी कुणाच्याही आणि कुठल्याही निमंत्रणाची वाट न पाहता आपणच उमेदवार आहोत हे मनाशी निश्चित करून काम करा. पुढील ११ दिवस प्रत्येकाने सरांसाठी द्या पुढील पाच वर्ष सर आपली सर्वांची काळजी घेतील : विश्वनाथ कोरडे
🔸 चौकट : महिला आणि महायुतीच एक भावनिक नात तयार झालेलं आहे. मतदारसंघातील प्रत्येक महिला महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते सर यांच्या पाठीशी कर्तव्य भावनेतून खंबीरपणे उभी असून ज्या दिवशी महायुतीचे उमेदवार या मतदारसंघात निवडून आल्याची अधिकृत घोषणा होईल त्या दिवशी बहिण भावाच्या नात्यात असलेल्या दृढ विश्वासाची प्रचीती येईल.
सौ. सोनाली सालके, भाजप महिला तालुकाध्यक्ष