महायुती सरकारने गरीबांसाठी तिजोरी खाली केली !
दादाभाऊ चितळकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल
नगर तालुक्यात काशिनाथ दाते यांचा प्रचार दौरा
नगर : प्रतिनिधी महायुती सरकार गोरगरीबांसाठी तिजोरी खाली करत असताना दुसरीकडे विरोधकांनी आपल्या तुंबडया भरण्याचेच काम केल्याचा हल्लोबोल करतानाच गेल्या सत्तर वर्षात विरोधकांनी काय केले याचा जाब मतदार निश्चित विचारतील असा विश्वास दुध संघाचे मा. चेअरमन दादाभाऊ चितळकर यांनी व्यक्त केला. देऊळगांव सिध्दी येथे महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत चितळकर हे बोलत होते. यावेळी विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, गणेश शेळके, सुनील थोरात, वसंत चेडे, सुभाष दुधाडे, विक्रम कळमकर, अशोक चेडे, पंढरीनाथ उंडे, धनंजय निमसे, दत्ता पवार यांच्यासह नगर तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. चितळकर म्हणालेे निवडणूक डोळयापुढे ठेऊन कोणी कितीही विकासाच्या गप्पा मारल्या तरीही मतदार शाश्वत आणि निरंतर विकास प्रक्रिया राबविणाऱ्या सरकारच्या पाठीशी खंबिरपणे उभी राहणार आहे. सध्याचे राजकारण पाहिले तर गरीबांनी पदाकडे जायचे नाही का असा सवाल करून हे पुढारी राजकरणात घराणेशाही आणू पाहत असल्याची टीका त्यांनी केली. काशिनाथ दाते हे अतिशय चांगले उमेदवार आहेत. सुसंस्कृत आहेत. सर्वसामान्य मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतील यात शंका नाही. त्यांना आम्ही मताधिक्य देणार असल्याचे चितळकर यांनी सांगितले. आपण आपलं हित जपलं पाहिजे असे सांगून चितळकर पुढे म्हणाले, हे आपलं सरकार आहे. महायुती सरकारने सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना राबविल्याआहेत. विरोधकांना केवळ सत्ता हवी आहे. त्यासाठी ते जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. या सरकारची नाळ समाजाशी जोडली आहे. महायुती सरकारने आगोदर केलेली कामेच विरोधकांनी आपल्या घोषणापत्रात मांडली आहेत. युती शासनाने महिलांना सवलत, ज्येष्ठ नागरीकांना सवलत, लाडकी बहिण योजना, शेतक-यांना विमा, वीज बिल माफी केली आहे. भावनिक होऊन मतदान न करता आपला आवाज विधानसभेत कोण उठविणार हे पाहून मतदान केले पाहिजे.
▪️चौकट
दाते सर सुसंस्कृत चेहरा
गेल्या ४० वर्षात पारनेर तालुक्यात सहकार क्षेत्रात काम करणारा सुसंस्कत चेहरा म्हणून दाते सरांची ओळख आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर मी तुमच्या जवळचा म्हणून मला ते सांगा.सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. दिवाळी निमित्त बहिणींना पैसे पाठविले हा अजितदादांचा वादा आहे. दादांचा हा शिलेदार तुमच्यासाठी तप्तर आहे.
प्रशांत गायकवाड
संचालक, जिल्हा बँक