निंबळक येथे एक कोटी रुपायाचे स्टेडियम उभारणा र

निंबळक येथे एक कोटी रुपायाचे स्टेडियम उभारणा र

निंबळक – नगर तालुक्यात क्रिकेट खेळण्याची आवड असलेल्या तरुणाची संख्या मोठया प्रमाणात आहे. अश्या खेळाडु साठी निबळक येथील  ग्रीन हिल स्टेडियम साठी एक कोटी रुपायाचे भव्य असे स्टेडियम उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगीतले

निंबळक ( ता. नगर ) येथे कै. संजय लामखडे व कै. विलासराव लामखडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोस्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्याव वतीने  लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले या स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लंके म्हणाले निंबळक येथे गेल्या तीस ते पसतीस वर्षापासून दोस्ती क्रिकेट क्लब दिवाळीत क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करत आहे .येथील मैदान  हि खेळाडू साठी चागले आहे. येथे खेळण्यासाठी जिल्हयातून संघ सहभागी होतात. खेळाडूची गैरसोय होत असल्यामुळे अजय लामखडे यांनी येथे स्टेडियमची मागणी केली होती. स्टेडियम साठी एक कोटी रुपये मंजुर झाले आहे. लवकरच स्टेडियमचे काम सुरु होणार आहे. या स्टेडियमचा तालुक्यातील खेळाडू ना क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी फायदा होणार आहे. लामखडे म्हणाले क्रिकेट स्पर्धा ह्या यू टयुबवर पाहण्याची व्यवस्था केली आहे. सात दिवस स्पर्धाचे आयोजन केले आहे. जवळपास पन्नास ते साठ संघानी सहभाग घेतला आहे. या स्पधेत 
 प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघाला ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, उपविजेतेपद मिळवणाऱ्या संघाला ४४ हजार ४४४ रुपयांचे रोख पारितोषिक व चषक, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघाला ३३ हजार ३३३ रुपये रोख पारितोषिक व चषक, चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या संघाला २२ हजार २२२ रुपये रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार.
आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, ‘मॅन ऑफ द फायनल मॅच’, ‘मॅन ऑफ द सिरीज’ ला प्रत्येकी २१०० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यावेळी सुनिल जाजगे, बाळासाहेब कोतकर, घनश्याम म्हस्के अविनाश आंळदीकर, बीडी. कोतकर, सोमनाथ खांदवे, बाबा पगारे, नाना दिवटे,त्रिदल सेवा संघटनेचे कार्यकर्ते तसेच दोस्ती क्ला व क्रिडा सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो – निंबळक येथे दोस्ती क्रिकेट क्लबने आयोजीत केलेल्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करताना आ. निलेश लंके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *