राहुरी शहरातील महिला व कार्यकर्त्यांचा कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी शहरातील महिला व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले की राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील हजारो युवक महिला व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत विशेष करून महिला वर्गामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून सरकारने राबविलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे समाधानाचे वातावरण असून कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाच्या व महायुतीच्या उमेदवारालाच मत द्यायचे असा निश्चय महिलांनी केला असल्याचे दिसत आहे. आगामी काळात प्रवेश केलेल्या महिला व कार्यकर्त्यांना मान सन्मानाची वागणूक मिळेल असा विश्वास त्यांनी दिला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, मारुती नालकर, समीर पठाण उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय वाघ व बेबी शिंदे, यांच्यासह सुनीता गुंजाळ, पूजा गुंजाळ, काजल शिंदे, विमल गुंजाळ, अश्विनी वाघमारे, कौशल्याबाई शिंदे मनीषा वाघ, मनीषा भांड, कल्पना धोत्रे, सुवर्णा खंडागळे, नंदा खंडागळे, नीता जोगदंड, गुड्डी जगधने, मंगल फुलारे, अनिता गायकवाड, पुष्पा गायकवाड, हौसाबाई हिरे, नीता अरणे, सुवर्णा खंडागळे, गुड्डी पाखरे, रत्नाबाई उबदे, चंदाबाई उबदे, अंजली हिरे आदींसह रवींद्र तनपुरे, योगेश पवार, मनोज गावडे, रुपेश साबळे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.