लाडकी बहीण योजना फक्त मतासाठी

लाडकी बहीण योजना फक्त मतासाठी

राज्यात महिला सुरक्षित नाही

मतदार संघात मागे ल त्याला ट्रान्सफार्मर दिले

राहुरी :

         या सरकारला महिलांचे काही एक देणे घेणे नाही. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत. राज्यामध्ये महिला सुरक्षित नसतील तर या सरकारला पाय उतार करण्याची हीच ती वेळ आहे. लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी अमलात न आणता ती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मत मिळविण्यासाठी अमलात आणली गेली आहे. असा घनघाती आरोप आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी महायुती सरकारवर केला आहे.

          राहुरी तालुक्यातील वळण, वळण-प्रिप्री, चंडकापुर आदि गावात महाविकास आघाडीचे उमेद्वार आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंञी, गृहमंत्री  तथा युती सरकारवर घनाघात केला. पुढे बोलताना ते म्हणाले की ,बदलापूर येथे शाळकरी मुलीवर शाळेत अत्याचार झाला. त्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब करण्यात आला. पोलिसांनी अत्यंत हलगर्जीपणा केला.महिलांवरील अत्याचाराबाबत या राज्यामध्ये सरकार जर सक्षम नाही. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतीवर अंबलुन आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली.तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मतदार संघात दिवसा वीज मिळावी म्हणून प्रकल्प उभे केले. शेतकऱ्यांना मागेल त्याला ट्रांसफार्मर दिले. मतदार सघात  शेकडो कोटी रूपयांची विकासकामे केली. आपल्या तालुक्यातील स्थानिक आमदारच आपल्या गरजा ओळखु शकतो म्हणून अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात जागतीने विकास कामे केली त्याच्या दुप्पट गतीने आगामी काळात आपण विकास काम करू असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

         याप्रसंगी प्रदेश युवक अध्यक्ष गणेश भोसले, सरपंच सुरेश मकासरे, उपसभापती बाळासाहेब खुळे, बाळासाहेब शिंदे, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, उमेश खिलारी, प्रकाश आढाव, बी.आर.खुळे, देवानंद मकासरे, वसंत कार्ले, रमन खुळे, बाबासाहेब आढाव, मुकुंदा काळे, रघुनाथ खिलारी, सिताराम गोसावी, भानाभाऊ खुळे, जैन्युदिन शेख, प्रकाश आढाव, विलास  आढाव, पिराजी वाघमारे, रोहिदास रंधे, अदिनाथ गडाख,कैलास देशमुख आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *