नगर तालुक्यात शेतकऱ्याचे आंदोलन
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांवर आज रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. निमगाव वाघा तालुका नगर येथे आज येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून या सरकारचा जाहीर निषेध केला आहे .या सरकारने म्हशीच्या दुधाला व गायचे दुधामध्ये दहा रुपयांनी घट केल्यामुळे शेतकरी…