रुईछत्तिशी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी – माजी सैनिकांचा सन्मान..

 रुईछत्तिशी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी – माजी सैनिकांचा सन्मान..
मेरी मिट्टी , मेरा देश अभियानाची गावागावात प्रभात फेरी..

रुईछत्तिशी – ( देविदास गोरे )

मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत रुई छत्तीसी  येथे आजी माजी सैनिकांचा सन्मान
भारताला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्ष पूर्ण होत आहेत.मागच्या वर्षीपासून संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.गावागावात आजी – माजी सैनिकांचा सन्मान करुन देशाचा अभिमान जपला जात आहे.रुईछत्तिशी येथे देखील मेरी मिट्टी , मेरा देश अभियान अंतर्गत आजी – माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.देशासाठी अनेक सैनिक शहीद झाले आहेत.शहीद जवानांना आदरांजली देण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत.तरुणांनी देशासाठी योगदान दिले पाहिजे. भारत मातेची सुरक्षा जोपासण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे हाच संदेश देण्यात आला.भारत मातेच्या रक्षणासाठी प्रत्येक श्वास , प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.तरुणांना देशासाठी प्रेरित होता आलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवण्यात आला. आजी सैनिक , त्यांचे पालक , माजी सैनिक यांना गुलाबपुष्प शाल , श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
                गावागावात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. देशभक्तीपर गीते गाऊन देशाच्या क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली.ग्रामपंचायत , सेवा सोसायटी , इतर खाजगी संस्था यांनी पुढाकार घेऊन देशसैनिकांप्रती अभिमान ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले.गावागावात अमृत महोत्सवी हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले.ध्वजारोहण करण्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.सैनिकांच्या सन्मान प्रसंगी गावचे सरपंच , उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य , चेअरमन , व्हा.चेअरमन , संचालक , ग्रामस्थ , तरुण मंडळी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *