गुरूवर्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा
अहमदनगर -( ता. नगर ) येथील १९८१ ते १९९१ मधील शिक्षकांनी अत्यंत निःस्वार्थी आणि निस्पृह भावनेने
अखंड ज्ञानदान करत पिढ्या घडविण्याचे काम केले. अशा या सर्व गुरुवर्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा
इयत्ता दहावी बॅच १९९० – १९९१ मधील विद्यार्थोनी आयोजीत केला आहे.
माध्यमिक विद्यालयातील सेवा निवृत्त व सेवेतील शिक्षक
बबनराव सातपुते,भाऊसाहेब कोतकर ,
पुष्पा औटी, देविदास गडाख, भानुदास कोतकर,
नंदकुमार तोडमल, संजय गेरंगे. गंगाधर घोलप.
दत्ता मुठे.
जि.प.प्राथमिक शाळेतील सेवा निवृत्त शिक्षक
किसन केदार, गंगाधर लांडे, निवृत्ती बांगर,
विठ्ठल काळे, रावसाहेब सोनवणे,संतोष भालेराव,
शशिकांत इथापे, मिनाक्षी विजय दगडे , मंगला होमकर या शिक्षकांचा समावेश आहे. हा सोहळा
रविवार दि.२७/०८/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. ठिकाण श्री मंदीर, ता.जि.अ.नगर. येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यास सहकुटुंब, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती इयत्ता दहावी बॅच १९९० – १९९१ मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी केली आहे.
चौकट- बदलत्या शिक्षण व्यवस्थेत गुरू आणि शिक्षक यांच्यातील दुवा पूर्वीच्या तुलनेत आता कमी होत असताना दिसत आहे आणि ह्या सोहल्याच्या निमित्ताने आज जे शिक्षक 70/ 85 वर्षे ह्या वयातील असताना इतक्या प्रदीर्घ काळानंतर त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा गुरुवर्याना अत्यन्त आनंद आणि भावनिक क्षण देणारा प्रसंग आहे ! त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज सामाजिक राजकीय वैद्यकीय शैक्षणिक विविध व्यावसायिक भारतीय सैन्य दल राज्य शासन आदी क्षेत्रात काम करत आहेत !