कामगारांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी कामगार मोर्चाच्या कार्यकत्यांनी प्रयत्न करावे – प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे
अहमदनगर – केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहीती कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानी तळागाळातील कामगारांपर्यत पोहचवून लाभ मिळवून दयावा असे अवाहन भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी केले.
उत्तर महाराष्ट्र दौ-या दरम्यान अहमदनगर शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालयात अहमदनगर दक्षिण जिल्हा,अहमदनगर उत्तर जिल्हा, अहमदनगर शहर, जिल्हयामधील पदाधिकाऱ्याची मंगळवार दि. २२ रोजी आयोजित केलेल्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते.यावेळी त् प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे ,प्रदेश सदस्य अॅड पाटील, कामगार कार्यकर्ते शामराव पिंपळे, जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला आघाडी यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हरगुडे यांचे स्वागत केले.या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कामगारांसाठीच्या विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कामगारांची ईश्रम कार्ड नोंदणी करून बांधकाम कामगार तसेच घरेलू कामगार यांना लाभ मिळवून देऊ. तसेच मोदी@९, घर चलो अभियान, आयुष्यमान भारत योजना, आवास योजना यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा कार्यकर्त्यांनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी व्यक्त्त केली…
यावेळी शामराव पिंपळे, शहर प्रमुख सुरेंद्र गांधी, तुषार पोटे, सचिन पारखी, सतिश चव्हाण, निवृत्ती जावळे, नानासाहेब शिंदे, प्रताप शिंदे, महेबूब शेख, सोमनाथ ताकवले, राहुल अडागळे, प्रितेश टकले, रघुनाथ आंबेडकर, बाबासाहेब शेवाळे, गोरख शेवाळे, यांसह शहरातील पदाधिकारी अहमदनगर दक्षिण जिल्हा आणि उत्तर जिल्ह्यातील पदाधिकारी या बैठकीला हजर होते.