सामाजिक भावनेतून वाढदिवस केला साजरा…

 सामाजिक भावनेतून वाढदिवस केला साजरा…

कामरगावचे माजी सरपंच व युवा नेते गणेश साठे यांचा अनोखा उपक्रम…
जिल्हा परिषद शाळेला केली आर्थीक मदत
नगर ब्रेकींग न्यूज _ अनावश्यक खर्च वाढदिवसानिमित्त  करण्याची वृत्ती एकीकडे  वाढत असतांना दुसरीकडे सामाजिक भावनेतून वंचितांना आपल्या आनंदात सहभागी करून त्याच्या बरोबर वाढदिवस साजरा करण्याच उदाहरण  समाजात तसं क्वचितच पाहायला मिळत. कामरगावचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश साठे यांनीही आपला वाढदिवस सामाजिक बांधलिकी जपत साजरा केला
 आपण ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेप्रती आपली सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी  वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या रंग रंगोटीसाठी  निधीची अडचण होती ती सोडवली. कलरसाठी त 11000/- रुपये रोख, गावातील पवनपुत्र सामजिक संस्थेतर्फे 10000/- आणि युवा नेते अंकुश ठोकळ- 10000/- रोख अशी एकूण 31000/- मदत केली. त या भरीव मदतीमुळे शाळेचे पूर्ण रंगकाम होणार असून शाळेला एक नवीन चेहरा प्राप्त होणार आहे 
        या प्रसंगी उपस्थित बबन बुरकुले, बबन मेजर ठोकळ, भाऊसाहेब संभाजी साठे, हाबु शिंदे, राजु पठाण, रोहन भुजबळ, संतोष शिंदे, योगेश आंधळे, पैलवान अविनाश आंधळे, नुरमहम्मद शेख, सुयोग भुजबळ रावसाहेब सातपुते, सुलतान पठाण, कैलाश जंगम, सुरज ठोकळ,  पवन पूत्र मंडळ अध्यक्ष तेजस ठोकळ , रवी बुरकुले, भरत शिंदे, सुलतान पठाण, मारुती साठे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पवनपुत्र मंडळ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते 
    यापूर्वी देखील त्यांनी त्यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या काळात गावामध्ये कोट्यावधी रुपयांची कामे केलेली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कामाक्षा माता मंदिर सभामंडप (४० लाख रुपये ), गावातील स्मशानभूमी (४० लाख रुपये) व गाव अंतर्गत येणारे कॉंक्रीटीकरन रस्ते व गटर लाईन कामे (१ कोटी रुपये) हि कामे अवघ्या ५ वर्षात मार्गी लावली आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *