वासुदेव रुपी ज्ञान व देवकी रुपी भक्तीने देव जन्माला येतो – हभप बाळकृष्ण महाराज वसंतगडकर.

 वासुदेव रुपी ज्ञान व देवकी रुपी भक्तीने देव जन्माला येतो – हभप बाळकृष्ण महाराज वसंतगडकर.
रुईछत्तिशी येथे सप्ताहाची सांगता..

देविदास गोरे.

रुईछत्तीशी – वासुदेव रुपी ज्ञानाने व देवकी रुपी भक्तीने देव जन्माला येतो , ज्याच्यासाठी आपण भक्ती करतो तेच जर कळत नसेल तर भक्ती करण्यात काहीच अर्थ नाही , भक्ती आणि ज्ञान यांचा संगम म्हणजे एकरुप होणे असे मत हभप बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांनी केले. 

रुईछत्तिशी ( ता. नगर ) येथे काल्याच्या किर्तनरुपी सेवेत ते बोलत होते.समाजात आज भक्ती आणि ज्ञान यांची गरज आहे.आजकाल होणाऱ्या समाजविघातक गोष्टी ज्ञान आणि भक्तीने दूर होतील असे प्रतिपादन करताना त्यांनी भक्तजन मोहून टाकले होते. रुईछत्तिशी येथे गेल्या सात दिवसांपासून सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.गावात संपूर्ण भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.दररोज रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
                      बबन महाराज बहिरवाल , जनार्दन महाराज  शिंदे , राम महाराज शास्त्री , बाळासाहेब महाराज रंजाळे , श्रीनिवास महाराज घुगे , मुरारी महाराज आनंदे , विलास महाराज गेजगे यांनी सात दिवस सप्ताहाची पुष्पे गुंफली.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांची सेवा गावातील मावळे परिवार यांच्या वतीने ठेवण्यात आली होती. काल्याचे कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.गावातील सर्व महिला , ग्रामस्थ , भजनी मंडळ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. गावात दररोज रात्री आयोजित केलेल्या अन्नदानामुळे तालुक्यात या सप्ताहाचे विशेष कौतुक करण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *