नगर ब्रेकींग न्यूज
भाजपच्या ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी संतोष म्हस्के यांची निवड
नगर ब्रेकींगकृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा माजी उपसभापती संतोष म्हस्के यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
रामसत्य उदयोग समूहाचे संचालक, शांत व संयमी युवा नेतृत्व तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे वाळुंज गावचे संतोष म्हस्के यांची नगर तालुक्यात ओळख आहे.बाजार समिती उपसभापती असताना कोरोना काळात त्यांनी बाजार समिती संचालित कोविड सेंटर चालवत मोठे काम केले.त्यातून अनेक गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला होता. जन सामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.निस्वार्थ, निःस्पृह भावनेने सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भारतीय जनता पक्षाने विश्वास दाखवत न्याय दिला असल्याची भावना वाळुंज परिसरातून व्यक्त होत आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल खा. सुजय विखे पाटील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, अभिलाष घिगे, रेवणनाथ चोभे, खरेदी विक्री संघाचे माजी सुरेशराव सुंबे , सरपंच शरद बोठे, श्रीकांत कार्ले, मोहन गहिले यासह वाळुंज ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.