गणरायांच्या आनंदात दुष्काळाचे विरजण , ईडा पिडा टळु दे , बळीच राज्य येऊ दे अशी प्रार्थना..

 गणरायांच्या आनंदात दुष्काळाचे विरजण , ईडा पिडा टळु दे , बळीच राज्य येऊ दे अशी प्रार्थना..

देविदास गोरे
रुईछत्तिशी – यंदा गणेशोत्सव मोठ्या धडाक्यात साजरे होताना दिसत असले तरी बळीराजा मात्र मोठ्या संकटात सापडला आहे.पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय बनली आहे. खरीप हंगाम धोक्यात जात असताना रब्बी हंगाम देखील जवळ आला आहे तरी पाऊस येत नसल्याने गणरायाच्या आनंदात दुष्काळाचे विरजण पडल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी गणपती उत्सवात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून बळीराजा सुखावला होता यंदा मात्र पाऊस पडला नसल्याने गणेश राया दुष्काळाच्या सावटात सापडले आहेत.भरपूर पाऊस पडला तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होते पण दोन तीन वर्षांतून पावसाने पाठ फिरवली की दुष्काळाचा सामना करावा लागतो अशी परिस्थिती गेल्या दहा – पंधरा वर्षातून निर्माण होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. ईडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना बळीराजाची होताना दिसत आहे.गणपती उत्सवात जर पाऊस पडला नाहीतर गणेश रायांना देखील कोरडा निरोप द्यावा लागणार आहे.गणपती उत्सवात तरी पाऊस येण्याची वाट बळीराजा पाहत असतो पण अनेक वेळा गणपती कोरडे गेल्याने यंदाही तशीच परिस्थिती होती की काय ! याचीच चिंता लागून राहिली आहे.
              गावोगावी गणपती उत्सव मोठ्या जंगी नियोजनाने साजरा होतो.शेतकरी वाजत गाजत गणेशाची मिरवणूक काढतात.ढोल ताशांच्या गजरात गणेशाची प्रतिष्ठापना करतात पण पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे मन हेलावून जाते.खरीप हंगामातील पिकांना पावसाची नवसंजीवनी मिळाली नसल्याने रब्बी हंगाम तरी गणेशराया तुमच्या कृपेने मोठ्या जोमाने पिकण्यासाठी मोठा पाऊस पडू दे अशी हाक बळीराजाच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.गणपती जर पाऊस आला नाहीतर पावसाळा गेला आणि दुष्काळ आला.जनावरांची पोटे कशी भरणार ! शेतकऱ्यांची धान्यलक्ष्मी घरात कशी शिरणार !  धान्यलक्ष्मी घरात शिरली नाहीतर दिवाळीची महालक्ष्मी देखील आनंदात जाणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सध्या तरी गणपती रायांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे हे सत्य नाकारुन चालणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *