वाडया वस्त्यावर सर्व रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार -राणी लंके
अहमदनगर -खडकी -खंडाळा परीसरातील रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली होती. नागरिकांना या रस्त्यावरून ये -जा करत असताना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या रस्त्यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. नगर पारनेर मतदार संघातील वाडया वस्त्यावर जाणाऱ्या सर्व रस्त्याचे कामे लवकरच मार्गी लावणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी सांगीतले.
आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून
खंडाळा, बाबूर्डी घूमट, वाळुंज रस्त्याचे कॉंक्रीटीकरन व डांबरीकरण,दौंड रस्ता ते खंडाळा अरनगाव रस्ता मजबुतीकरण मजबुती करण, पाझर तलाव दूरूस्ती आदी कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी मा. जि. प. सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जेष्ट नेते किसनराव लोटके, सरपंच सुजाता कार्ले, उपसरपंच दिपाली लोटके, मा सरपंच मोहनराव सुपेकर, गोरखराव सुपेकर,संपतराव लोटके, अरुणराव बनसोडे, बाळासाहेब लोटके, बिभीषण लोटके, राहुल लोटके, संतोष पोटघन, राजाराम सपेकर, शरद कोठुळे जनार्धन माने, पोपट पुंड, बाळासाहेब शिंदे, आन्ना चोभे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोटके सर यांनी केले.